• Download App
    धक्कादायक : तेलंगणात बदलली संविधानाची प्रस्तावना, दहावीच्या पुस्तकातून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढले|Shocking Preamble of constitution changed in Telangana, words socialist and secular removed from class 10 books

    धक्कादायक : तेलंगणात बदलली संविधानाची प्रस्तावना, दहावीच्या पुस्तकातून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढले

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : तेलंगणामध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूळ संकल्पनेशी छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुस्तकातून भारतीय राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द काढून टाकण्यात आले आहेत. हे शब्द काढून टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण विभागात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Shocking Preamble of constitution changed in Telangana, words socialist and secular removed from class 10 books

    नव्या आवृत्तीच्या पुस्तकातून सोशलिस्ट म्हणजेच समाजवाद आणि सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष हे शब्द काढून टाकल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर तेलंगणा राज्य युनायटेड टीचर्स फेडरेशनने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्याच वेळी, SCERT म्हणते की त्यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविकातून असा कोणताही शब्द काढण्याबद्दल सांगितले नाही. आता प्रश्न पडतो की त्यांनी हे आदेश दिले नाहीत, मग हे शब्द कसे काढले? या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.



    तपास अहवालात काय समोर आले?

    या संपूर्ण प्रकरणात दहावीची पुस्तके छापण्यापूर्वी प्रूफ रीडिंगच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे एससीईआरटीने स्पष्ट केले. त्याचवेळी राज्य शिक्षण मंडळाने सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (डीईओ) आदेश दिले आहेत की, ज्या पुस्तकांमध्ये हे शब्द छापण्यात आले आहेत, त्या पुस्तकांवर राज्यघटनेची मूळ प्रस्तावना छापून त्या पानावर चिकटवावी, जेणेकरून कोणताही विद्यार्थी संविधानाची चुकीची प्रस्तावना वाचणार नाही.

    तेलंगणामध्ये भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना बदलण्यात आल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. तर शिक्षण मंडळ मात्र अशा कोणत्याही घटनेचे सातत्याने खंडन केले आहे. तेलंगणा तेलंगणा स्टेट युनायटेड टीचर्स फेडरेशनने (टीएसयूटीएफ) ही मोठी चूक असल्याचे म्हटले असून ते छापणाऱ्या चुकीच्या प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    Shocking Preamble of constitution changed in Telangana, words socialist and secular removed from class 10 books

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Kangana Ranaut : तरुणांना राष्ट्रपतींचे नाव सांगता न आल्याने कंगना रनोट संतापल्या; युद्ध नव्हे टोळांसारखा मेंदू असलेली पिढी नक्कीच नाश करेल!

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत