विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कोरोना महामारीच्या काळामध्ये लॉक डाऊन झाले. महामारी, कोरोना, लॉकडाऊन यामुळे निराशा, चिंता, भीती यासारख्या मानसिक समस्या वाढू लागल्या. या काळात बऱ्याच लोकांनी आपले आयुष्य संपवले होते. महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Shocking! Increase in small businessmen suicides in 2020
2020 मध्ये छोट्या व्यावसायिकांच्या आत्महत्येच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येपेक्षा छोट्या व्यावसायिकांनी केलेल्या आत्महत्यांची संख्या अधिक आहे. असे आकडेवारीतून समोर आले आहे.
लॉकडाऊन काळात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांची विक्री आणि एकूण उत्पन्नामध्ये घट झाली होती. हे असतानाच बऱ्याच व्यावसायिकांना कोरोनाची लागण देखील झाली होती. उपचारासाठी केलेले केलेला खर्च, बंद झालेले उत्पन्न या दुहेरी संकटाचा सामना व्यावसायिकांना करावा लागला होता. त्यामुळे कमाई शुन्य होती आणि आजारपणाचा उपचार खर्च मोठा होता. या विषम परिस्थितीमुळे व्यावसायिकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचा अंदाज लावला जात आहे.
मानसिक पातळीवर खचलेल्या व्यावसायिकांना आवश्यक असे समुपदेश आणि मानसिक आधार मिळाला नसल्याचे समोर आले आहे. 2020 मध्ये एकूण 11,716 व्यावसायिकांनी आत्महत्या केली आहे आणि ही आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार ही आत्महत्येची आकडेवारी समोर आली आहे. देशातील आत्महत्यांच्या एकूण घटनांमध्ये मजुरांच्या आत्महत्या सर्वाधिक 24.6 टक्के आहे. असे या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे. तर इतर ऐकून आत्महत्यांचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.
रोजंदारीवरील मजूर – २४.६ टक्के
गृहिणी – १४.६ टक्के
व्यवसायिक – ११.३ टक्के
बेरोजगार – १०.२ टक्के
नोकरदार – ९.७ टक्के
विद्यार्थी – ८.२ टक्के
शेतकरी – ७ टक्के
निवृत्त नोकरदार – १ टक्के
इतर – १३ टक्के
Shocking! Increase in small businessmen suicides in 2020
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान