• Download App
    धक्कादायक : दिल्लीच्या रोहिणी कोर्टात गँगवॉर, गँगस्टर जितेंद्र गोगीसह 4 जण ठार । Shocking Gangwar in Delhi Rohini Court, gangster Jitendra Gogi and 4 others killed

    धक्कादायक : दिल्लीच्या रोहिणी कोर्टात गँगवॉर, गँगस्टर जितेंद्र गोगीसह 4 जण ठार

    Gangwar in Delhi Rohini Court : दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात शुक्रवारी गँगवॉर भडकले. गँगस्टर जितेंद्र गोगीची गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. या गँगवॉरमध्ये गोगीसह एकूण चार जण ठार झाले आहेत. या घटनेने राजधानीत एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारात 3 ते 4 जण जखमीही झाले आहेत. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोगी न्यायालयात हजर राहण्यासाठी आला होता. या वेळी दबा धरून बसलेल्या गुंडांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली, यातच त्याचा मृत्यू झाला. Shocking Gangwar in Delhi Rohini Court, gangster Jitendra Gogi and 4 others killed


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात शुक्रवारी गँगवॉर भडकले. गँगस्टर जितेंद्र गोगीची गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. या गँगवॉरमध्ये गोगीसह एकूण चार जण ठार झाले आहेत. या घटनेने राजधानीत एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारात 3 ते 4 जण जखमीही झाले आहेत. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोगी न्यायालयात हजर राहण्यासाठी आला होता. या वेळी दबा धरून बसलेल्या गुंडांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली, यातच त्याचा मृत्यू झाला.

    प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत टिल्लू टोळीतील दोन दरोडेखोर ठार झाले. दोघेही वकिलांचा पोशाख परिधान करून कोर्टात दाखल झाले. त्यांनी जितेंद्र गोगीवर गोळ्या झाडल्या. या दोन गुंडांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस अद्यापही करत आहेत. त्यांचे जुने वैर होते असे सांगितले जात आहे.

    दरम्यान, भरकोर्टात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राजधानीतील या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

    Shocking Gangwar in Delhi Rohini Court, gangster Jitendra Gogi and 4 others killed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र