• Download App
    प्रादेशिक नेत्यांची चिकाटी; काँग्रेसला मागे ढकलण्याची अखिलेश - ममता - कुमारस्वामींची नवी खेळी!! Shockers to Congress, Akhilesh Yadav, Mamata banerjee and H. D. Kumarswami played a different game

    Between the lines : प्रादेशिक नेत्यांची चिकाटी; काँग्रेसला मागे ढकलण्याची अखिलेश – ममता – कुमारस्वामींची नवी खेळी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातल्या सगळ्या मोदींना चोर ठरविल्याबद्दल राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिल्यानंतर त्यांना खासदारकी गमवावी लागली. पण त्याचा राजकीय लाभ राहुल गांधींना आणि काँग्रेसला मिळाला. सर्व प्रादेशिक नेत्यांना राहुल गांधीच्या पाठीशी तोंडदेखले का होईना, पण उभे राहावे लागले. पण असे असूनही प्रादेशिक नेत्यांनी आपली राजकीय चिकाटी सोडलेली नाही. Shockers to Congress, Akhilesh Yadav, Mamata banerjee and H. D. Kumarswami played a different game

    राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर काल त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले प्रादेशिक नेते आज नव्या खेळीसाठी सिद्ध झाले आहेत.

    उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये अखिलेश यादव यांनी राहुल गांधींना पाठिंबा जरूर दिला आहे, पण त्यांनी एक वक्तव्य करून काँग्रेसला मागे ढकलले आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांना नेहमीच दुय्यम लेखले. पण आता काँग्रेसची ही जबाबदारी आहे, की प्रादेशिक पक्षांना पुढे करून त्या पक्षांच्या पाठीशी उभे राहून आपण एकत्रित भाजपशी मुकाबला करावा. राहुल गांधींनी ओबीसींचा अपमान केला असे भाजपचे नेते म्हणत आहेत. पण त्यांनी लखनऊतले मुख्यमंत्री निवास गंगाजलाने धुतले तेव्हा कोणाचा अपमान झाला नाही का?? 15 लाख तुमच्या खात्यात भरतो असे जनतेला सांगून त्यांनी वादा खिलाफी केली, तेव्हा अपमान झाला नाही का??, असे सवाल अखिलेश यादव यांनी केले. पण त्याचवेळी त्यांनी काँग्रेसला प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना पुढे करण्याचे आवाहन करून काँग्रेसला मागे ढकलले.


    ममता म्हणाल्या, भाजपला राहुल गांधींना हीरो बनवायचे आहे, अधीर रंजन यांचा दावा- तृणमूलचा उद्देश भाजपला मदत करण्याचा


    दिल्ली आणि लखनऊत या घडामोडी घडत असताना दरम्यानच्या काळात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कोलकत्यात जाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी या कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल अर्थात जेडीएसचा प्रचार करणार असल्याची माहिती कुमारस्वामी यांनी दिली. कर्नाटकात काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून त्या पक्षाने 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर देखील केली आहे. काँग्रेसने भाजप विरोधात लढताना कर्नाटकात जेडीएसची साथ घ्यायला नकार दिला आहे. त्यामुळेच कुमारस्वामी यांनी वेगळी खेळी करत थेट कोलकता गाठून ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले. ममता बॅनर्जी आता कर्नाटकात जेडीएसच्या प्रचार सभांमध्ये भाषण करताना दिसणार आहेत. अर्थातच प्रादेशिक पक्षांची मजबूत आघाडी करण्याच्या दिशेने कर्नाटकात त्यांचे पाऊल पडणार आहे.

    याचा अर्थच राहुल गांधींचे खासदारकी रद्द झाल्यानंतर काल प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागले असले, तरी प्रादेशिक नेत्यांचे मूळ इरादे रद्द झालेले नाहीत. प्रादेशिक पक्षांची मजबूत आघाडी उभी करून काँग्रेसच्या पाठिंब्याने आपण भाजपची टक्कर घेण्याचा प्रादेशिक नेत्यांचा मुख्य मनसुबा आहे. यात काँग्रेसला मागे ढकलण्याचाच खरा प्रयत्न आहे आणि हीच प्रादेशिक नेत्यांची खरी चिकाटी आहे. ती अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि एच. डी. कुमारस्वामी यांच्या राजकीय खेळ्यांमधून दिसली आहे.

    Shockers to Congress, Akhilesh Yadav, Mamata banerjee and H. D. Kumarswami played a different game

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य