• Download App
    बिभव कुमारला तीस हजारी न्यायालयातून आणखी एक धक्का Shock to Vibhav Kumar from Tis Hazari court sent to police custody

    बिभव कुमारला तीस हजारी न्यायालयातून आणखी एक धक्का

    पोलीस कोठडीत तीन दिवसांसाठी रवानगी Shock to Vibhav Kumar from Tis Hazari court sent to police custody for three days

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभव कुमार यांना न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    चार दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर बिभव कुमार यांना महानगर दंडाधिकारी गौरव गोयल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी बिभव यांना पाच दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची कोठडी दिली. आता त्यांना 31 मे रोजी हजर केले जाणार आहे.



    काल (सोमवारी) तीस हजारी न्यायालयाने बिभव कुमार यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना दणका दिला असून आज त्यांची कोठडी किती दिवस वाढवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या लेखी तक्रारीनंतर कुमार यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली होती.

    ‘बिभव सहकार्य करत नाही’

    दिल्ली पोलिसांचे तपास पथक बिभव कुमारवर सतत आरोप करत आहे की तो तपासात सहकार्य करत नाही आणि प्रश्नांची अस्पष्ट उत्तरे देत आहे. त्याने जाणूनबुजून आपल्या मोबाईलचा पासवर्ड उघड केला नाही, असा आरोपही करण्यात आला असून, ही सत्यता शोधण्यासाठी तपासातील महत्त्वाची माहिती आहे. 13 मे रोजी केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेल्यावर कुमारने त्यांच्यावर हल्ला केला, असा आरोप मालीवाल यांनी केला आहे.

    Shock to Vibhav Kumar from Tis Hazari court sent to police custody

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CJI BR Gavai : CJI म्हणाले- परीक्षेतील गुण-रँक यश निश्चित करत नाहीत; यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक

    राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे यात्रा; पण काँग्रेसच्या आमदाराने संतापातून बोलून दाखवली कर्नाटकातली हतबलता!!

    Karnataka : कर्नाटक- काँग्रेस आमदार केसी वीरेंद्रना EDकडून अटक; छाप्यात 12 कोटींची रोकड आणि 6 कोटींचे दागिने जप्त