पाकिस्तानी अभिनेत्रीला केली आपली वधू.
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने तिसऱ्या लग्नाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करताना शोएब मलिकने ही माहिती दिली आहे. या क्रिकेटरने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये शोएब त्याच्या तिसऱ्या पत्नीचा हात हातात धरून हसताना दिसत आहे.Shoaib Malik got married for the third time after leaving Sania Mirza
मात्र, शोएब मलिकला लग्नाबद्दल शुभेच्छा देण्याऐवजी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक दिवसांपासून शोएब मलिकचा पत्नी सानिया मिर्झासोबत घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत होत्या. या संदर्भात या जोडप्याने कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. अशा परिस्थितीत शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाने या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
शोएब मलिकने त्याच्या ट्विटर आणि इंस्टा हँडलवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. शोएब तिसऱ्यांदा वर बनला आहे, याआधी आयशा सिद्दीकी आणि सानिया मिर्झा या त्याच्या दोन पत्नी होत्या. सध्या या लग्नसोहळ्यातील दोनच छायाचित्रे समोर आली आहेत. शोएब मलिकची माजी पत्नी सानिया मिर्झानेही त्याच्या लग्नाला हजेरी लावली की नाही हे पाहणे बाकी आहे.