• Download App
    shivsmarak जुवेरिया बोट, अंगात लाईफ जॅकेट, डोळ्याला दुर्बीण; संभाजीराजेंनी केली अरबी समुद्रात शिवस्मारकाची राजकीय "शोध मोहीम"!!

    shivsmarak जुवेरिया बोट, अंगात लाईफ जॅकेट, डोळ्याला दुर्बीण; संभाजीराजेंनी केली अरबी समुद्रात शिवस्मारकाची राजकीय “शोध मोहीम”!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एस. बी. जुवेरिया बोट अंगात लाईफ जॅकेट, डोळ्याला दुर्बीण; संभाजी राजांनी केले अरबी समुद्रात शिवस्मारकाची राजकीय “शोध मोहीम”!! shivsmarak In Arabian Sea Updates Maharashtra Politics Vidhansabha Nivdnuk

    संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य संघटनेला विधानसभा निवडणुकीत मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपल्या कार्यकर्त्यांसाठी राजकीय उपक्रम हाती घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 2016 मध्ये शिवस्मारकाचे जलपूजन झाले होते. ते नेमके कुठे झाले होते??, ते शिवस्मारक कुठे आहे??, अशी शोध मोहीम राबवण्याचा निर्णय त्यांनी यापूर्वीच जाहीर केला होता. पुण्याहून शेकडो कार्यकर्ते घेऊन संभाजीराजे मुंबईला पोहोचले, मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. संभाजीराजे यांना निवडक कार्यकर्त्यांसह शोध मोहीम घ्यायला पोलिसांनी परवानगी दिली. दरम्यानच्या काळात संभाजी
    राजे यांनी पत्रकारांना बाईट देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक होऊ शकते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक का होऊ शकत नाही??, असा सवाल दोन्ही सरकारांना केला.

    मात्र शिवस्मारकाला विरोध करणारे वकील कोण आहेत??, ते काँग्रेसचा अधिकृत प्रचार करणारे नेतेच आहेत, हे संभाजीराजे यांनी पाहावे आणि त्यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त करावी, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मात्र त्याविषयी संभाजीराजे यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नाही.

    संभाजीराजे यांनी निवडक कार्यकर्त्यांसह एस. बी. जुबेरिया बोटीतून अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाची राजकीय शोध मोहीम पूर्ण केली. त्यावेळी अंगात लाईफ जॅकेट आणि डोळ्याला दुर्बीण असा त्यांचा पोशाख होता.

    shivsmarak In Arabian Sea Updates Maharashtra Politics Vidhansabha Nivdnuk

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’