• Download App
    शिवसेना उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व जागा लढवणार, यूपीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडल्याचा आरोप । Shivsena Will Fight In All 403 Seats In Uttar Pradesh

    शिवसेना उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व जागा लढवणार, यूपीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडल्याचा आरोप

    Shivsena Will Fight In All 403 Seats In Uttar Pradesh : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना सर्व 403 जागा लढवणार आहे. पक्षाच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. Shivsena Will Fight In All 403 Seats In Uttar Pradesh


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना सर्व 403 जागा लढवणार आहे. पक्षाच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

    बैठकीत शिवसेनेने आरोप केला की, भाजप सरकारच्या राजवटीत तेथील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. यूपीतील मुली आणि महिला सुरक्षित नाहीत.

    दारुलशाफा येथे झालेल्या बैठकीत प्रदेश प्रमुख ठाकूर अनिल सिंह म्हणाले की, यूपीमधील सरकार ब्राह्मणांशी चांगले वागत नाही. ते म्हणाले की, राज्यातील वैद्यकीय आणि शिक्षण व्यवस्थेची स्थितीही वाईट आहे. लोक बेरोजगारी आणि महागाईनेही त्रस्त आहेत. यामुळेच शिवसेना तेथील सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

    काय म्हणाले संजय राऊत?

    शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यूपीत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली. सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा देणार का? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, ‘सपा, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेशाबाबत आमची काही भूमिका नाही. सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा का द्यावा? शिवसेना निवडणूक लढवेल, पण स्वतंत्रपणे लढवेल. त्यांची आघाडी त्यांच्यापाशी. त्यांच्या आघाडीला शुभेच्छा. आम्ही उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवतोय, असंही ते म्हणाले.

    Shivsena Will Fight In All 403 Seats In Uttar Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली