काही महिन्यांपूर्वी रामदास कदम यांची अनिल परबांविरोधातील एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तेव्हापासून शिवसेनेत त्यांच्याविरोधात वातावरण तयार झालं आहे. अशावेळी रामदास कदम हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने देखील जोर धरला होता. याच सगळ्याबाबत खुलासा करण्यासाठी रामदास कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि अनेक गोष्टींचा खुलासा केला.SHIVSENA VS SHIVSENA: Ramdas Kadam of Anil Parab who is a traitor? Ramdas Kama also expressed his displeasure over the party leaders at the press conference
विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबईत शनिवार (18 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन शिवसेना मंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध तुफान टीका केली. मात्र, यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं आणि आपल्याला नाकारलं याबाबत आपल्या मनात नाराजी असल्याचं रामदास कदमांनी जाहीरपणे सांगितलं.त्यामुळे आता शिवसेना विरूद्ध शिवसेना असे चित्र तयार झाले आहे.याच पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मनात नेमकी काय खदखद आहे ही देखील बोलून दाखवली. पाहा रामदास कदम नेमकं काय म्हणाले.
‘सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं याचं मला वाईट वाटलं’-
‘एक गोपनीय गोष्ट होती ती तुम्हाला सांगतो. शिवसेना भवनात मी स्वत: उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. साहेब, रामदास कदम, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई आमचं आता 70 च्या आसपास वय झालं आहे. आम्हाला मंत्रिपदं देऊ नका. तुम्ही नवीन लोकांना मंत्रिपदं द्या.
‘मला साहेब म्हणाले नक्की? मी म्हटलं हो साहेब नक्की.. माझी तयारी आहे. पण ज्यावेळेस मंत्रिपदाची लिस्ट आली तेव्हा सगळ्यात आधी नाव सुभाष देसाईचं होतं. मला वाईट वाटलं ते.”माझं मन मुद्दाम मी मोकळं करतोय आज. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही. मी मंत्रिपद मागितलंच नाही.
पण सुभाष देसाईंना देताय आणि मला नाही म्हणता.. म्हणून मला वाईट वाटलं त्याचं. द्या ना तुम्ही मंत्रिपदं नवीन मुलांना..”याच गोष्टीचं मला जास्त दु:ख झालं. शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश हा शिरसावंद्य आहे मला. कुठेही त्यात दुमत नाही.’
‘मी पुन्हा एकदा सांगतो.. प्रस्ताव असा ठेवला होता की, मी, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई आता आमची वयं झालेली आहेत. आता आम्हाला बाजूला ठेवा तिघांनाही आणि नवीन लोकांना संधी द्या. असा प्रस्ताव मी ठेवला होता.’
‘उद्धव साहेब हो म्हणाले. पण जेव्हा यादी आली पण सगळ्यात आधी नाव सुभाष देसाईंचं आलं शपथविधीसाठी पहिल्या दोन मध्ये. त्याचं थोडसं दु:ख झालं मला. मी खोटं कशाला बोलणार, आहे ते आहे.’
‘जे मंत्री हरामखोरी करीत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घातला आहे.’ अशी टीका रामदास कदम यांनी अनिल परबांवर केली आहे.
‘गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम? मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षाक्षी गद्दारी करतात आणि आमच्या मुलाच्या जीवावर उठतात. दापोली आणि मंडणगड येथे योगेश कदम स्थानिक आमदार आहेत. परंतु अनिल परबांनी स्थानिक जिल्हाप्रमुखांना हाताशी घेऊन थेट उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.’
‘अनिल परब हा शिवसेनेच्या मुळावर उठलेला आहे. निष्ठावंतांची हकालपट्टी करत बाटग्यांना अनिल परबांनी तिकिटं दिली. आम्ही निष्ठावंत असुनही मिळणाऱ्या वागणुकीचं दुःख होतं’ असं म्हणत रामदासा कदमांनी अनिल परब यांच्यावर टीकेची झोड उठवली.
‘उद्धवजींना तुम्ही मदत करत असाल तर त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही दुसऱ्या नेत्याला संपवा असा होत नाही. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी प्रयत्न केले होते. पण असं झालं नाही म्हणून सुडाची भावना ठेवत अनिल परब आता माझ्याविरुद्ध षडयंत्र रचत आहे.’
SHIVSENA VS SHIVSENA: Ramdas Kadam of Anil Parab who is a traitor? Ramdas Kama also expressed his displeasure over the party leaders at the press conference
महत्त्वाच्या बातम्या
- धर्मांतर रोखण्यासाठी विहिंपचा पुढाकार; ३१ डिसेंबरपर्यंत धर्म रक्षा अभियान सुरु
- AMIT SHAH : अतिथी देवो भव ! स्वतचा राखीव सूट अमित शाहंना-वाह उपमुख्यमंत्री;महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन
- मुलींच्या लग्नाच्या वयावरून ओवैसींचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले- मोदी मोहल्ल्याचे अंकल झालेत, लग्नाच्या बाबतीत अशी बंधने का?
- Amit Shah : महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र ! अमित शाहंचे गौरवोद्गार ; सहकारासाठी मोदी सरकार २४ तास ३६५ दिवस उपलब्ध