• Download App
    SHIVRAJ SINGH : शिवराज सिंह चौहानांचे अनोखे रूप ! थिरकले ढोलच्या तालावर; आदिवासी बांधवांसोबत नृत्य ; व्हिडिओ व्हायरल । SHIVRAJ SINGH: Unique look of Shivraj Singh Chouhan! On the beat of a throbbing drum; Dancing with tribal brothers; Video goes viral

    SHIVRAJ SINGH : शिवराज सिंह चौहानांचे अनोखे रूप ! थिरकले ढोलच्या तालावर; आदिवासी बांधवांसोबत नृत्य ; व्हिडिओ व्हायरल

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी गौरव सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला
    • यामुळे दर 15 नोव्हेंबरला संपूर्ण देशात आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे
    • मंडलामध्ये आदिवासी गौरव दिन सप्ताहाचे आयोजन
    • मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे मंडलामध्ये आदिवासी बांधवांसोबत नृत्य

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंडलामध्ये आदिवासी बांधवांसोबत ढोलवर नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मंडलामध्ये आदिवासी गौरव दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील सहभागी झाले होते. SHIVRAJ SINGH: Unique look of Shivraj Singh Chouhan! On the beat of a throbbing drum; Dancing with tribal brothers; Video goes viral

    यावेळी त्यांचे अनोखे रूप पहायला मिळाले .त्यांनी ढोल वाजवत ठेका देखील धरला .मुख्यमंत्री नेहमीच आपली वेगळी शैली जनतेसमोर आणत असतात.मागे देखील त्यांनी हेलीपॅडवर ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या मदर पोलीसच्या मुलीला कडेवर घेत तीला आशीर्वाद दिले होते.

    या कायक्रमामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले असून, ते आपल्या पारंपरीक पोशाखामध्ये नृत्य करत आहेत, तर त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री चौहान यांनी देखील ढोल वाजवत नृत्य केले आहे.

    आदिवासींची मिळकत वाढवणे यावर काम

    या कार्यक्रमादरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आता दारूच्या दुकांनावर मोहापासून बनवण्यात आलेली दारू देखील विकता येणार आहे. सरकारने या दारूला अधिकृत परवानगी दिली आहे. मोहाच्या फुलापासून बनवण्यात आलेली दारू हेरिटेज दारूच्या नावाने दुकांवर विकता येईल. चौहान म्हणाले की, मोहाची फुले गोळा करणे आणि त्यापासून वेगवेगळ्या वस्तुंची निर्मिती करणे, हा आदिवासी लोकांचा पारंपरिक व्यवसाय आहे. यामधून मिळणाऱ्या पैशांमधून त्यांचे घर चालते.

    त्यांची आर्थिक प्राप्ती वाढावी, नवे आर्थिक स्त्रोत उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही मोहाच्या दारूला अधिकृत परवानगी दिली आहे.

    SHIVRAJ SINGH : Unique look of Shivraj Singh Chouhan! On the beat of a throbbing drum; Dancing with tribal brothers; Video goes viral

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य