विशेष प्रतिनिधी
भोपाळ : काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडल वर मामांचे श्राद्ध घातले आणि मध्य प्रदेशात प्रचंड संताप उसळला. shivraj chauhan Shraddha on Congress Twitter anger in madhya pradesh
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय घमासन सुरू असताना काँग्रेसचा तोल सुटला आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे तिकीट भाजपने कापल्याची बातमी पसरवून त्याचा संबंध सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाशी जोडला.
भाजपने शिवराज सिंह चौहान यांचे तिकीट कापून मामांचे श्राद्ध घातले, असे खोडसाळ ट्विट काँग्रेसच्या हँडलवर एकाने केले. ते सगळीकडे व्हायरल झाले. त्यामुळे मध्य प्रदेशात प्रचंड संताप उसळला आहे.
शिवराज सिंह चौहान यांचे चिरंजीव कार्तिकेय सिंह यांनी देखील संताप व्यक्त करत काँग्रेसच्या या अश्लाघ्य कृतीचा निषेध केला आहे. निवडणुका येतात आणि जातात. सत्ता येते आणि जाते. निवडणुकांचा मामला फक्त चार दिवसांचा असतो. असली घटिया हरकत करून तुम्ही तुमच्या मुलांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकाल का?? असा संतप्त सवाल कार्तिकेय सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना केला आहे.
वास्तविक भाजपने शिवराज सिंह चौहान यांचे तिकीट बिलकुल कापलेले नाही. ते मध्य प्रदेश मधल्या बुधनी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, पण तरी देखील काँग्रेस नेत्यांनी शिवराज सिंहांचे तिकीट भाजपने कापल्याचा खोडसाळ प्रचार करण्यासाठी ट्विटरवर त्यांचे श्राद्ध घातले आणि ते आता काँग्रेस वरच उलटताना दिसत आहे.
shivraj chauhan Shraddha on Congress Twitter anger in madhya pradesh
महत्वाच्या बातम्या
- हमासच्या 25 दहशतवाद्यांना मारणारी इस्रायली वीरांगना इनबल लिबरमॅन!!; इस्रायली भारतीयांनी केले वंदन!!
- …तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही” एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर घणाघात!
- अमेरिकेने पाठवली शस्त्रास्त्रांची पहिली खेप, आता इस्रायलच्या प्रत्युत्तरातील कारवाईने हमास हादरणार!
- रतन टाटा यांनी ‘या’ बाबतीत आनंद महिंद्रांना मागे टाकत केला नवा विक्रम