• Download App
    ज्याला आम्ही चालायला शिकविले, त्यानेच आम्हाला पायाखाली रगडले, शिवपाल सिंह यादव यांची अखिलेशवर टीका Shivpal Singh Yadav's criticism of Akhilesh, The one who we taught us walk, rubbed us underfoot

    ज्याला आम्ही चालायला शिकविले, त्यानेच आम्हाला पायाखाली रगडले, शिवपाल सिंह यादव यांची अखिलेशवर टीका

    ज्याला आम्ही चालायला शिकवले, त्यानेच आम्हाला पायाखाली रगडले, अशी टीका समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे बंधू शिवपाल सिंह यांनी अखिलेश यादव यांच्यावर केली आहे. शिवपाल सिंह यादव यांना समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आजम खान यांनीही पाठिंबा दिला आहे. Shivpal Singh Yadav’s criticism of Akhilesh, The one who we taught us walk, rubbed us underfoot


    विशेष प्रतिनिधी

    लखनौ :ज्याला आम्ही चालायला शिकवले, त्यानेच आम्हाला पायाखाली रगडले, अशी टीका समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे बंधू शिवपाल सिंह यांनी अखिलेश यादव यांच्यावर केली आहे. शिवपाल सिंह यादव यांना समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आजम खान यांनीही पाठिंबा दिला आहे.

    उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आजम खान आणि शिवपालसिंह यादव यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. शिवपालसिंह म्हणाले, आपल्या सन्मानासाठी मी कोणत्याही स्तरावर जाऊन त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला. एवढे केल्यावरही मी नाराज आहे, तर त्याने मला कशा प्रकारे दु:ख दिले असेल, याचा विचार करा.



    सीतापूर जेलमध्ये मागील अडीच वर्षांपासून बंद असलेले आजम खान यांच्याकडे अखिलेश यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. अब्दुल्ला आजम यांनी आपल्या पित्याचा हवाला देत ट्विट केले आहे की, -तू छोड रहा है, तो खता इसमें तेरी क्या, हर शख्स मेरा साथ, निभा भी नही सकता. त्यांच्या ट्विटरचा रोख अखिलेश यांच्याकडे आहे. अखिलेश यांना आजम खान यांच्या जेलबद्दल काहीच वाटत नसल्याचे आजम खान यांच्या निकटवतीर्यांचे म्हणणे आहे.

    शिवपाल सिंह २०१७मध्ये सपापासून वेगळे झाले होते. त्यानंतर त्यांनी प्रगतिशील सपा बनवली होती. यावेळी ते पुनर्गठनाची चर्चा करीत आहेत. यावेळी त्यांना आजम खान यांची साथ मिळेल, असा त्यांना विश्वास वाटत आहे.

    Shivpal Singh Yadav’s criticism of Akhilesh, The one who we taught us walk, rubbed us underfoot

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!