• Download App
    कर्नाटकात बागलकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेस सरकारने हटविला; कर्नाटक - महाराष्ट्रात प्रचंड संताप!! Shivaji Maharaj's statue was removed by the Congress karnataka government 

    कर्नाटकात बागलकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेस सरकारने हटविला; कर्नाटक – महाराष्ट्रात प्रचंड संताप!!

    प्रतिनिधी

    बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेस सरकारने बागलकोट शहरात मध्यरात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून हटविला. नगरपालिकेची परवानगी न घेता शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याचा काँग्रेस सरकारचा दावा होता. परवा मध्यरात्रीच्या अंधारात नगरपालिका प्रशासनाने हा पुतळा हटविला. त्यामुळे कर्नाटकसह महाराष्ट्रात प्रचंड संताप उसळला असून लाखो शिवप्रेमींनी बागलकोट बंदची हाक दिली आहे.
    बागलकोटचे माजी आमदार वीरण्णा चरणीमठ यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्याची प्रतिज्ञा केली आहे. Shivaji Maharaj’s statue was removed by the Congress karnataka government

    या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने बागलकोट गदक सह वेगवेगळ्या शहरांमध्ये जमावबंदीचे आदेश काढले आहेत, पण तरी देखील शिवद्रोही सरकार विरुद्धचा संताप आटोक्यात आणण्यात काँग्रेस सरकारला नाकी नऊ आले आहेत महाराष्ट्रात देखील या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटक सरकारच्या मुजोरीचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.

    सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला

    या ट्वीटमध्ये मुनगंटीवार म्हणतात :

    बागलकोट चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटकच्या हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारने हटवला, ही घटना संतापजनक आहे.

    या घटनेचा तीव्र निषेध आम्ही नोंदवत आहोत. शिवराज्याभिषेकाचा 350 वा महोत्सव उत्साहात सुरू असतांनाच कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला ही अवदसा आठवली आहे.

    कर्नाटकची राजधानी असलेले बंगळूर शहर हे स्वतः शहाजी राजांनी उभारलेले शहर आहे, याचीही जाणीव छत्रपतींचा द्वेष करणाऱ्या काँग्रेस सरकारने ठेवली नाही. याचे गंभीर परिणाम कर्नाटकच्या #काँग्रेस_सरकार व पक्षाला भोगावे लागतील.

    Shivaji Maharaj’s statue was removed by the Congress karnataka government

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले