विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर खालच्या स्तरावर येऊन टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरच घसरले आहेत, इतकेच नाही तर आपल्या नव्या “नेहरू वळणा”च्या आधारे त्यांनी शिवाजी महाराजांनाच एका अलग प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. Shivaji Maharaj looted Surat, sitting above looted Mumbai
केंद्रातल्या मोदी सरकारवर निशाणा साधताना उद्धव ठाकरेंनी जे ट्विट केले, त्यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना थेट केंद्र सरकारशी केली. “छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. हे वर बसलेले दलाल महाराष्ट्राची राजधानी लुटत आहेत. मुंबई मॉडेलचे जगात कौतुक झाले. पण या नालायकांना त्याचे कौतुक नाही”, अशा शब्दांचे ट्विट उद्धव ठाकरे यांनी केले.
यात उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सुरत लुटण्याचा आरोप तर ठेवलाच, वर केंद्र सरकारची तुलना शिवाजी महाराजांशी करून त्यांनाही “लुटारू” ठरविले. हेच उद्धव ठाकरेंचे “नेहरू वळणा”चे नवे इतिहास ज्ञान आहे!!
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या “डिस्कवरी ऑफ इंडिया” या प्रसिद्ध ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांना “वाट चुकलेला देशभक्त”, “लुटारू” असेच संबोधले होते. त्यावेळी महाराष्ट्रात नेहरूंच्या विरुद्ध प्रचंड जनक्षोभ उसळला होता आणि नेहरूंना अखेर त्याविषयी माफी मागावी लागली होती. पण हा जनक्षोभ उसळविण्यामध्ये उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे आघाडीवर होते. आज त्याच आजोबांचे नातू “नेहरू वळणा”वर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना “लुटारू” ठरवत आहेत, इतकेच नाही तर ते केंद्र सरकारची अस्थानी तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून त्या सरकारला देखील “मुंबईचे लुटारू” ठरवत आहेत.
Shivaji Maharaj looted Surat, sitting above looted Mumbai
महत्वाच्या बातम्या