• Download App
    Shiv Sena's image enhancement in Thane; BJP breaks image; NCP's 

    “धर्मवीर” : ठाण्यात शिवसेनेचे प्रतिमा वर्धन; भाजपकडून प्रतिमा भंजन; राष्ट्रवादीची खुसपटी!!

    मुंबई महापालिका निवडणुका जवळ येताना शिवसेनेने प्रशासनामार्फत चतुराईची खेळी करत “सर्वांसाठी पाणी” ही योजना प्रभारी राबविण्याचे ठरवले आहे. एकीकडे शिवसेनेचे नेतृत्व मुंबई महापालिकेसाठी अशी सुप्त तयारी करताना भाजप नेत्यांनी आक्रमक होत पोलखोल यात्रा यशस्वी केली. यापुढच्या काळात हा संघर्ष असाच कायम राहणार आहे. Shiv Sena’s image enhancement in Thane; BJP breaks image; NCP’s

    पण आता त्यापलिकडे देखील शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकांविरोधात तलवारी पाजळल्या दिसून येत आहे. ठाण्यामध्ये एकीकडे “धर्मवीर” सिनेमाच्या निमित्ताने शिवसेना प्रतिमा वर्धनाच्या तयारीत असताना दुसरीकडे भाजप शिवसेनेचे प्रतिमा भंजन करण्यासाठी आपल्या पोलखोल यात्रेचे एक्सटेंशन ठाण्यात करण्याच्या तयारीत आहे.

    “धर्मवीर” सिनेमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन एकनाथ शिंदे यांना मातोश्रीचे राजकीय बळ मिळवून दिले आहे. याचाच अर्थ शिवसेना ठाण्यातली निवडणूक मुंबई इतकीच सिरियसली घेत असल्याचे ते निदर्शक आहे.

    शिवसेनेच्या या राजकीय सीरियसनेस मध्ये मुंबई-ठाण्यात स्वबळावर पूर्णपणे सत्ता पुन्हा काबीज करण्याचा मनसूबा तर आहेच, पण त्याच वेळी या दोन्ही महापालिकांमध्ये महाविकास आघाडीच्या निमित्ताने राष्ट्रवादी जो “लुडबुडी प्रवेश” करू इच्छित आहे, त्यालाही लगाम लावण्याचा सुप्त मनसूबा यातून दिसून येतो आहे…!!

    धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित सिनेमाच्या निमित्ताने ट्रेलर लॉन्चला स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हजर राहिले. यातून ठाण्याला ते किती महत्त्व देतात हेच स्पष्ट झाले. त्यातही सलमान खान ची उपस्थिती बरेच काही “वेगळे बोलून” गेली…!! एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा खऱ्या अर्थाने बूस्टर डोस आहे. पण बूस्टर डोस मात्र ठाणे महापालिकेत “लुडबूडी शिरकाव” करू पाहणाऱ्या जितेंद्र आव्हाडांसाठी “अँटी बूस्टर डोस” ठरताना दिसत आहे.

    ठाणे महापालिकेत शिरकाव करण्याची जितेंद्र आव्हाडांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ते उघडपणे एकनाथ शिंदे यांना एकीकडे आव्हान देत असतात, तर दुसरीकडे आवाहन करत असतात…!! पण एकनाथ शिंदे आव्हाडांना दाद देत नाहीत. हे अनेकदा दिसून आले आहे.

    – आदित्य ठाकरेंना डिवचले

    या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत आव्हाड यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचणारे एक ट्विट केले आहे. मुंबई हायकोर्टाने आदित्य ठाकरे यांचा आवडत्या पवई तलाव जॉगिंग आणि सायकल ट्रॅक प्रकल्पाला खीळ घातली, हा पर्यावरणवाद्यांचा विजय असल्याचे ट्विट त्यांनी केले. यातून शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठाण्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. पण हा संघर्ष अंगाशी येत असल्याचे पाहताच आपल्यावर उलटले असे पाहताच ऋता आव्हाड यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून एक ट्विट केले आहे आदित्य ठाकरे यांचे आपण आली अभिनंदन केले आहे ते मीडियाला दिसले नाही आपला संघर्ष मात्र दिसला असे शरसंधान ऋता आव्हाड यांनी नव्या ट्विट मधून केले आहे.

    खरं म्हणजे राष्ट्रवादीला शिवसेनेबरोबर आघाडी हवी आहे शिवसेनेला राष्ट्रवादीचे झेंगट गळ्यात घ्यायचे नाही हे पक्के आहे. यातूनच ऋता सामंत आव्हाड यांचे ट्विट येणे आणि ते आदित्य ठाकरे यांच्या दिशेने जाणे ही घटना बरीच राजकीय दृष्ट्या बोलकी आहे…!!

    – ठाण्यातही भाजपचे पोलखोल

    या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप ठाण्यात शिवसेने विरुद्ध नव्याने आघाडी उघडून पाहत आहे यातूनच पोलखोल यात्रेचे एक्स्टेंशन ठाण्यात करण्याचे घाटत आहे. ठाणे महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची काळी पुस्तिका आणि 50 प्रकरणांचे प्रदर्शन वगैरे नवे इनिशिएटिव्ह भाजप घेत आहे. यातून शिवसेनेवर चोहोबाजूंनी हल्ला चढवण्याचा भाजपचा मनसुबा दिसतो आहे. “धर्मवीर” सिनेमाच्या निमित्ताने शिवसेना जे प्रतिमा वर्धन करू पाहत आहेत, त्याचेच प्रतिमा भंजन भाजपवर करू पाहत आहे. पण पर्यावरण प्रेमाचे निवडक ट्विट करून राष्ट्रवादी मात्र त्याच खुसपटे शोधताना दिसत आहे…!!

    Shiv Sena’s image enhancement in Thane; BJP breaks image; NCP’s

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली