Saturday, 10 May 2025
  • Download App
    नबाब मलिकांच्या आरोपांना शिवसेनेनेच नाकारले, खासदार राहूल शेवाळे म्हणाले केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत Shiv Sena denies Nabab Malik's allegations, MP Rahul Shewale says Center will help Maharashtra

    नबाब मलिकांच्या आरोपांना शिवसेनेनेच नाकारले, खासदार राहूल शेवाळे म्हणाले केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत

    राज्याचे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री आणिराष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केंद्र सरकारविरोधात आरोप करून राजकारण सुरू केले आहे. मात्र, शिवसेनेनेच मलिक यांच्या आरोपांना नाकारले आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करत आहे, असे शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी म्हटले आहे. Shiv Sena denies Nabab Malik’s allegations, MP Rahul Shewale says Center will help Maharashtra


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केंद्र सरकारविरोधात आरोप करून राजकारण सुरू केले आहे. मात्र, शिवसेनेनेच मलिक यांच्या आरोपांना नाकारले आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करत आहे, असे शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी म्हटले आहे.

    रेमेडिसीव्हर इंजेक्शन बनविणाऱ्या कंपन्यांनी महाराष्ट्राला हे इंजेक्शन विकू नये यासाठी केंद्राने दबाव आणला असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र, शेवाळे यांनी मलिक यांचे आरोप हे त्यांचे वैयक्तिक आहेत. सरकारची भूकिा नाही, असे म्हटले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकार कोरोनाविरुध्द लढण्यासाठी हातात हात घालून काम करत आहे.



    केंद्र सरकारकडून सर्व प्रकारची मदत मिळत असल्याचे म्हटले आहे. शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत मला काहीही माहिती नाही. उलट केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहे. राज्याकडून केली गेलेली वैद्यकीय मदतीची मागणी केंद्राकडून पुरविली जात आहे.

    नुकतीच आम्ही केंद्रीय राज्य मंत्री मनुसख मांडविय यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे बीआरडी फार्माकडे महाराष्ट्राने केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. मांडविय यांनी आपले म्हणणे मान्य केले आहे. त्यामुळे दोन दिवसांत मागणी पूर्ण होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे सर्व कंपन्यांनी त्यांची निर्यात पूर्णपणे बंद केली आहे. देशांतर्गत गरज पुरविण्यावरच भर दिला आहे. त्यामुळे मलिक काय म्हणत आहेत हे मला माहित नाही.

    शेवाळे यांनी ट्विट करून केंद्राकडे मागणी केली होती की सर्व राज्यांना रेमेडिसीव्हरचा पुरवठा करून तुटवडा कमी करावा. त्यासाठी सरकारी रुग्णालयांना प्राधान्य द्यावे. रेमेडेसिव्हर निर्यात करणाऱ्या आपल्याकडे १६ कंपन्या आहेत. निर्यात बंद झाल्यामुळे त्यांच्याकडे रेमेडिसिव्हरची २० लाख इंजेक्शन शिल्लक आहेत.

    Shiv Sena denies Nabab Malik’s allegations, MP Rahul Shewale says Center will help Maharashtra

    महत्वाच्या बातम्या वाचा

    Related posts

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Pakistani terrorists : BSF ने 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना केले ठार; S400-आकाशने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले

    Ganga Expressway : पाकिस्तान युद्धात गंगा एक्सप्रेसवे गेम चेंजर; राफेलपासून हरक्यूलिस उतरले