वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एडेल्गिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी यादी 2023 गुरुवारी प्रसिद्ध झाली. यामध्ये एचसीएलचे सहसंस्थापक शिव नाडर यांनी आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2,042 कोटी रुपयांची देणगी दिली. म्हणजेच त्यांनी दररोज 5.6 कोटी रुपये दान केले. त्यांच्या खालोखाल विप्रोचे संस्थापक-अध्यक्ष अझीम प्रेमजी आहेत, ज्यांनी 1,774 कोटी रुपयांचे दान दिले.Shiv Nadar tops Hurun India philanthropy list, donates Rs 5.6 crore daily in 2023
झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ हे सर्वात तरुण दानवीर म्हणून उदयास आले आहेत. निखिल यांनी त्यांचे भाऊ आणि झिरोधाचे सीईओ नितीन कामथ यांच्यासह 110 कोटी रुपयांचे दान दिले. या यादीत 119 देणगीदारांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांनी 2023 या आर्थिक वर्षात 8,445 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
हुरुन इंडिया फिलान्थ्रोपीच्या यादीत सात महिला
या यादीत सात महिलांचा समावेश आहे. पहिल्या क्रमांकावर रोहिणी नीलेकणी, रोहिणी नीलेकणी फिलान्थ्रॉपीजच्या संस्थापक आहेत. त्यांनी 170 कोटी रुपयांची देणगी दिली. एक काळ असा होता की या यादीत त्या एकट्याच होत्या. रोहिणी यांच्या पाठोपाठ थर्मॅक्सच्या अनु आगा आणि कुटुंबाचा क्रमांक लागतो, ज्यांनी 23 कोटी रुपयांची देणगी दिली आणि यूएसव्हीच्या लीना गांधी तिवारी यांनीही 23 कोटी रुपयांची देणगी दिली.
इन्फोसिसच्या सह-संस्थापकांसह 25 नवीन लोकांचा समावेश
यावर्षी, यादीत 25 नवीन प्रवेशकर्ते आहेत, ज्यात इन्फोसिसचे सह-संस्थापक के दिनेश, रमेशचंद्र टी जैन आणि भिलोसा इंडस्ट्रीजचे कुटुंब, ऍक्सेलचे प्रशांत प्रकाश आणि झोहो कॉर्पोरेशनचे वेम्बू राधा यांचा समावेश आहे. या वर्षी आपली अर्धी संपत्ती दान करण्यासाठी द गिव्हिंग प्लेजवर स्वाक्षरी करणारे निखिल कामथ या यादीतील सर्वात तरुण दानवीर राहिले आहे.
Shiv Nadar tops Hurun India philanthropy list, donates Rs 5.6 crore daily in 2023
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation : ”सरकार म्हणून कुठलाही निर्णय घाई गडबडीत घेऊ शकत नाही”, मुख्यमंत्री शिंदेंची स्पष्ट भूमिका!
- world cup 2023 : लंकेचे पुरते पत्ते पिसले, 55 धावांत डाव कोसळला; टीम भारत सेमी फायनल मध्ये!!
- अंगणवाडी सेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांनाही खुशखबर; दिवाळीत एसटी महामंडळाला 378 कोटींची मदत!!
- मनोज जरांगेंचे उपोषण सुटले; मराठा आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारी 2024 पर्यंत दिला वेळ!!