• Download App
    उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिव ज्योति अर्पणम महोत्सव; क्षिप्रा नदीचा किनारा २१ लाख दिव्यांनी उजळणार। Shiv Jyoti Arpanam Festival in madhyprdesh

    उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिव ज्योति अर्पणम महोत्सव; क्षिप्रा नदीचा किनारा २१ लाख दिव्यांनी उजळणार

    वृत्तसंस्था

    उज्जैन : महाशिवरात्री निमित्त ‘महाकाल की नगरी’ (भगवान शंकराचे नगर) असलेल्या मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये शिव ज्योति अर्पणम महोत्सव होणार आहे. क्षिप्रा नदीचा किनारा २१ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळेल. तसेच नदी किनाऱ्यावरील मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये दीप प्रज्वलित करून संपूर्ण नदीकिनारा प्रकाशमान केला जाईल. Shiv Jyoti Arpanam Festival in madhyprdesh

    मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उज्जैनमध्ये महोत्सवाचे आयोजन करत असल्याची घोषणा केली. समाजाच्या सर्व वर्गांतील नागरिकांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.क्षिप्रा नदीच्या दोन्ही तटांवर दिवे प्रज्वलित केले जातील. नदी किनाऱ्यांवर १३ लाख दिवे प्रज्वलित केले जातील. मंदिरांमधून दीप प्रज्वलित केले जातील. यात महाकाल मंदिर, मंगलनाथ मंदिर काल भैरव मंदिर, गड कालिका, सिद्धवट, हरसिद्धि मंदिर यांसह इतर प्रमुख मंदिरांचा समावेश आहे.



    या कार्यक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद होणार आहे. याकरिता ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ची टीम संपूर्ण उत्सवाची पाहणी करण्यासाठी उज्जैनमध्ये दाखल झाली आहे.

    Shiv Jyoti Arpanam Festival in madhyprdesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र