• Download App
    दोन – तीन वर्षे थंड राहिलेल्या मायावतींच्या बसपला मिळाला नवा साथी; पंजाबमध्ये अकाली दलाबरोबर लढणार Shiromani Akali Dal (SAD) and BSP are coming together once again and we are going to sweep the elections in Punjab

    दोन – तीन वर्षे थंड राहिलेल्या मायावतींच्या बसपला मिळाला नवा साथी; पंजाबमध्ये अकाली दलाबरोबर लढणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – गेली दोन – तीन वर्षे राजकीयदृष्ट्या थंड पडलेल्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना नवा साथी मिळाला आहे. पंजाबमध्ये अकाली दलाने बहुजन समाज पक्षाशी आघाडी करून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. Shiromani Akali Dal (SAD) and BSP are coming together once again and we are going to sweep the elections in Punjab

    पंजाबमध्ये अकाली दल आणि बसप एकत्रितरित्या निवडणूक लढवतील आणि राज्यात प्रचंड बहुमत मिळवतील, असा दावा अकाली दलाचे आमदार एन. के. शर्मा यांनी चंडीगडमध्ये केला आहे.

    अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष हे दोन्ही पक्ष सध्या राजकीयदृष्ट्या गलितगात्र अवस्थेत आहेत. दोन्ही पक्षांकडे सध्या सत्ता नाही. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने अकाली दलात थोडी धुगधुगी निर्माण झाली. पण राज्यात स्वबळावर सत्तेवर येण्याएवढी ती पुरेशी नाही. त्यातच अकाली दलाचा जुना सहकारी पक्ष भाजप त्यांच्या बरोबर नाही.

    भाजपचे पंजाबमधले स्वतंत्र अस्तित्व नगण्य असले, तरी त्या पक्षाबरोबरची युती अकाली दलाला नेहमीच बहुमताचा आकडा गाठण्यासाठी उपयुक्त ठरली होती. शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात देखील अकाली दलाला स्थान मिळत राहिले होते. पण कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून अकाली दल आणि भाजप यांच्यातली दरी बरीच रूंदावली आहे. त्यातून अकाली दल नवीन मित्राच्या शोधात होते. तो गलितगात्र बहुजन समाज पक्षाच्या रूपाने मिळाला आहे.

    बहुजन समाज पक्षाचीही एकेकाळी पंजाबमध्ये बऱ्यापैकी पकड होती. उत्तर प्रदेशाबरोबरच पंजाबमध्ये काशीराम यांनी राजकीय लक्ष केंद्रीत केले होते. उत्तर प्रदेशात मायावतींच्या रूपाने त्यांनी नेतृत्व उभे केले. पण मायावतींनी स्वतंत्रपणे निर्णय घेऊन काशीराम यांनाच दूर केले होते. नंतर काशीराम यांचे निधन झाल्याने मायावती याच बसपच्या एकछत्री नेत्या बनल्या. त्यांनी उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रीत केले. एकदा पूर्ण बहुमत मिळविले. पण २०१४ नंतर बसप आपले अस्तित्व हरवून बसली.

    आता मायावतींना अकाली दलाच्या रूपाने पंजाबमध्ये तरी नवा साथी मिळाला आहे. त्यामुळे तेथील बहुजन समाज पक्षात राजकीय धुगधुगी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात जागावाटपाच्या चर्चा अजून सुरू व्हायच्या आहेत. त्यातून काय बाहेर येते यावर दोन्ही पक्षांच्या आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

    Shiromani Akali Dal (SAD) and BSP are coming together once again and we are going to sweep the elections in Punjab

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!