शिरोमणी अकाली दल आणि मायावती यांच्या नेतृत्वात बसपाने आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत एकत्रित राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 117 विधानसभा जागांपैकी बहुजन समाज पक्ष (बसपा) 20 जागा लढवणार आहे आणि शिरोमणी अकाली दल उर्वरित 97 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Shiromani Akali Dal Bahujan Samaj Party SAD – BSP Alliance For Upcoming Punjab Assembly Elections in 2022
विशेष प्रतिनिधी
चंदिगड : शिरोमणी अकाली दल आणि मायावती यांच्या नेतृत्वात बसपाने आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत एकत्रित राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 117 विधानसभा जागांपैकी बहुजन समाज पक्ष (बसपा) 20 जागा लढवणार आहे आणि शिरोमणी अकाली दल उर्वरित 97 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सुखबीरसिंग बादल यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, ‘दोन्ही पक्षांची विचारसरणी दूरदर्शी आहे आणि दोन्ही पक्ष गरीब शेतकरी कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत. पंजाबच्या राजकारणासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. तत्पूर्वी, अकाली दल आणि बसपा या दोन्ही पक्षांनी 1996 च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढा दिला होता. तेव्हा बसप सुप्रीमो कांशीराम यांनी पंजाबमधून निवडणुका जिंकल्या होत्या. सप्टेंबर 2020 मध्ये एनडीएच्या घटक अकाली दलाने संसदेने मंजूर केलेल्या तीन नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ मोदी सरकारमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.
एक दिवसापूर्वी अकाली दलाच्या ‘मुलाजाम मोर्चा’च्या (कर्मचाऱ्यांचा मोर्चा) बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी बादल यांना निवेदन दिले. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री म्हणाले की, त्यांचा पक्ष आपल्या जाहीरनाम्यात फक्त अशा मागण्यांचा समावेश करेल, ज्या सत्तेत आल्यावर पूर्ण करता येतील. 2022च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष आपला जाहीरनामा ऑक्टोबरपर्यंत तयार करेल. कॉंग्रेसने खोटी आश्वासने दिली आणि सत्ता मिळविण्यासाठी जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही बादल यांनी केला.
Shiromani Akali Dal Bahujan Samaj Party SAD – BSP Alliance For Upcoming Punjab Assembly Elections in 2022
महत्त्वाच्या बातम्या
- अर्थमंत्री सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक, अनेक वस्तूंचे दर कमी करण्याची शिफारस
- Corona Update : 70 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद, मृतांचा आकडा अजूनही 4 हजारांपेक्षा जास्त
- FACT CHECK : CoWIN पोर्टल हॅक, 15 कोटी भारतीयांचा डेटा लीक? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल मेसेजचे सत्य
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावाचा वापर करून अनेकांना लाखोंचा गंडा; आरोपींना कर्नाटकातून अटक
- Mumbai Unlock updates : मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम; लोकल सेवा बंद राहणार