प्रतिनिधी
पुणे : पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याचा थरार रंगण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील सर्व कुस्तीगिरांच्या मानधनात तिप्पट वाढ केली. Shinde-Fadnavis government’s threefold increase in the government remuneration of wrestlers in Maharashtra
- महाराष्ट्रात ज्या खेळाडूंना 2 वर्षांपासून मानधन मिळत नाहीय. जे 6000 मानधन मिळत होते, ते आता 20000 हजार करणार.
- अर्जुन पुरस्कार विजेत्या पैलवानांना 6000 रुपये मानधन देण्यात येते, ते देखील आता 20000 रुपये करणार
- हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद पैलवानांना फक्त 4000 रुपये मानधन देण्यात येते, त्याऐवजी येतात 15000 रुपये मानधन करणार.
- वयोवृद्ध खेळाडूंना 2500 मानधन आहे ते आता 7500 करणार.
- महाराष्ट्र केसरी खेळाडूंना राज्य सरकार नोकरीत संधी देणार
अशा महत्त्वपूर्ण घोषणा फडणवीस यांनी केल्या.
Shinde-Fadnavis government’s threefold increase in the government remuneration of wrestlers in Maharashtra
महत्वाच्या बातम्या