• Download App
    इस्लामी धर्मांतरासाठी शिजान खान आणि परिवाराचा तुनिषावर दबाव; तुनिषाच्या आईचा गंभीर आरोप Shijan Khan and family put pressure on Tunisha to convert to Islam

    इस्लामी धर्मांतरासाठी शिजान खान आणि परिवाराचा तुनिषावर दबाव; तुनिषाच्या आईचा गंभीर आरोप

    प्रतिनिधी

    मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषद घेत, तुनिषाचा मित्र आणि सहकलाकार शिजान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिजान खानने तिच्याशी ब्रेकअप केल्यानंतर तुनिषा तणावात होती, तिच्या वर्तनात बदल दिसत होता. शिजान सेटवर नशा सुद्धा करायचा. शिजान खान आणि त्याचा परिवार तुनिषावर मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. Shijan Khan and family put pressure on Tunisha to convert to Islam

    तुनिषाने शिजानचा मोबाईल चेक केला होता, यात शिजानने त्याच्या मैत्रिणीशी केलेले चॅट तुनिषाला सापडले होते. याबाबत तुनिषाने त्याला विचारले असता शिजानने तिला चापट मारली आणि सांगितले की, तुला जे हवे ते कर. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तुनिषाने मला सांगितले, अशी माहिती वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.



    आधीच एका मुलीशी संबंध असताना शिजान खान याने तुनिषाशी जवळीक का वाढवली??, असा प्रश्न मला पडला आहे. तुनिषाच्या मृत्यूला शिजान खानच जबाबदार आहे. शिजान तुनिषाचा मानसिक छळ करीत होता. तुनिषाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय तुनिषाच्या आईने व्यक्त केला आहे. तुनिषा माझ्यावर अजिबात नाराज नव्हती. तिला कोणत्याच गोष्टीसाठी मी नकार दिला नाही, असेही तुनिषाच्या आईने सांगितले.

    Shijan Khan and family put pressure on Tunisha to convert to Islam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Gold price : सोन्याच्या किमतींनी रचला नवा इतिहास, पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या पुढे गेला