- या मंदिरात जी माती ठेवली होती, ती माती बाहेर काढली जाणार आहे.
- कोणार्क सूर्य मंदिराच्या जगमोहन किंवा मुखशाला परिसरातून माती काढली जाईल.
- 118 वर्षांनंतर पुन्हा एकदा सूर्य मंदिराचे गर्भद्वार उघडले जाणार आहे.
- या संदर्भात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) प्रक्रिया सुरू केली आहे. Shifting sands, creeping shadows-KONARK: 118 years – Konark temple – Garbhadwara to open! The reason behind closing the Garbhadwara for so many years …
विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : ओडिशातील कोणार्क सूर्य मंदिराच्या जगमोहन किंवा मुखशाला संकुलातून माती काढली जाणार आहे . 118 वर्षांनंतर पुन्हा एकदा सूर्य मंदिराचे गर्भद्वार उघडले जाणार आहे. या संदर्भात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) प्रक्रिया सुरू केली आहे. जागतिक ऐतिहासिक वारसा यादीत समाविष्ट असलेले कोणार्क सूर्य मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) यांच्या मते, 118 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी या मंदिराला पडण्यापासून वाचवण्यासाठी मातीची भरणी केली होती. जर या परिसरातून या मातीला (Sun Temple Sand) बाहेर काढण्यात आले तर 100 वर्षांहून अधिक काळानंतर या मंदिरात असलेले जगमोहन मुखशाला आहे त्याचे द्वार उघडले जाईल.
सध्या पुरातत्त्व सर्वेक्षण
संस्थेने(एएसआय) या बद्दलची प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे आणि या पुढे हे मंदिर याच संस्थेच्या सुपूर्त करण्यात आले आहे. या प्रस्तावित कामासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि लवकरच या मंदिराच्या परिसरात असलेले माती उकरण्याचे काम सुरू होईल.त्याच बरोबर अनेकांच्या मनात एक प्रश्न पडला असेल की नेमके असे काय कारण होते ज्यामुळे या परिसरात माती टाकण्यात आली तसेच ही माती कशी काढली जाईल व या मातीचे भविष्यात नेमके काय फायदे होतील या बद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.
इंडियन एक्स्प्रेस रिपोर्ट नुसार ,भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ही संस्था ओडिशातील सूर्य मंदिराच्या आतील भागात असणारी माती अगदी सुरक्षितपणे बाहेर काढून टाकण्यासाठी एक रोडमॅप तयार करत आहे , या भागाला जगमोहन म्हणतात.
हा या मंदिराचा मध्यवर्ती भाग आहे.आता तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की मंदिरातून माती बाहेर टाकणे हा विषय इतका गंभीर का आहे, खरतर अनेक वर्षांपूर्वी या मंदिर भग्न अवस्थेत गेले होते आणि हे मंदिर जमीनदोस्त होते की काय अशी शंका अनेकांच्या मनात येऊ लागली होती. मंदिर जमीनदोस्त होऊ नये म्हणुन या मंदिराला आधार देण्यासाठी मातीची भरणी करण्यात आली.
कोणी केली होती मातीची भरणी…
या रिपोर्ट नुसारच 13 व्या शतकाच्या काळात जीर्णोद्धार झालेल्या या मंदिरात 1903 मध्ये मातीची भरणी करण्यात आली. लेफ्टनंट गव्हर्नर सर जॉन वुडबर्न यांनी 1900सालाच्या सुरुवातीला येथे भेट दिली होती त्यानंतर त्या काळातही या मंदिराची कीर्ती बरीच प्रसिद्ध होती. भारताच्या सर्वात भव्य इमारतींपैकी एक म्हणून या वास्तूची प्रसिध्दी घोषित करण्यात आली तसेच या भव्यतेचे वर्णन केले गेले होते. मंदिरात मातीची केली गेलेली भरणी बद्दल या सगळ्या घटनेवर आधारित अनेक वेगवगळे रिपोर्ट सुद्धा बनवले गेले. तसे पाहायला गेले तर हे मंदिर जमीनदोस्त होऊ नये तसेच याची कीर्ती लयाला जाऊ नये हा हेतू मनात ठेवून या मंदिरात मातीची भरणी केली गेली.
कश्या पद्धतीने करण्यात आली होती ही भरणी..
या मंदिराची संरचना की अगदी वेगळी आहे जर आपण प्रत्यक्ष जर पाहिले तर आपल्याला मंदिराचे फक्त गेट पाहायला मिळते आणि म्हणूनच मंदिराच्या आतील प्रत्येक रिकाम्या क्षेत्रात मातीची भरणी केली गेली जेणेकरून मंदिराचा कोणताही भाग पडून कोसळू नये.
काय आहे जगमोहन ?
जर जगनमोहन बद्दल बोलायचे झाल्यास जगमोहन म्हणजे मंदिराच्या आतील सभामंडप होय. ओडिशा येथील हिंदू मंदिरात मधोमध एक हॉल असतो त्यालाच या भागात जगमोहन असे म्हणतात. खरेतर हे मंदिराचे प्रवेश द्वार आणि गर्भद्वार याच्यातील मधील जो परिसर असतो यालाच जगमोहन असे म्हटले जाते. हे मंदिर सुर्यदेवांना समर्पित केलेले आहे.
अशा स्थितीत प्राथमिक टप्प्यात ही प्रक्रिया कशी पूर्ण होते याचा तपास एएसआय अधिकारी करतील. हे काम एएसआयच्या वतीने मद्रासच्या मदतीने केले जाणार आहे. यासाठी चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. संवर्धन कार्याचे नेतृत्व अरुण मेनन, सहयोगी प्राध्यापक, स्ट्रक्चरल अभियांत्रिकी विभाग, IIT मद्रास करतील. सध्याच्या परिस्थितीत जगमोहनच्या आत असलेली वाळू 12.5 फुटांपर्यंत गेली आहे.
15 व्या शतकाच्या सुमारास मुस्लिम सैन्याने या मंदिरावर आक्रमण केले होते. त्यानंतर येथील पुजाऱ्यांनी सूर्यदेवतेची मूर्ती जगन्नाथ मंदिरात ठेवली. या मंदिराचा वरच्या बाजूला चुंबकीय दगड ठेवण्यात आलेला आहे ज्यामुळे समुद्रातून जाणारे कोणतेही जहाज या चुंबकीय दगडाच्या दिशेने आकर्षित होते. असेही म्हटले जाते कि, भिंतींचा समतोल राखण्यासाठी मंदिराच्या कळसावर चुंबक ठेवण्यात आले होते.
Shifting sands, creeping shadows-KONARK: 118 years – Konark temple – Garbhadwara to open! The reason behind closing the Garbhadwara for so many years …
महत्त्वाच्या बातम्या
- आरिफ मोहम्मद खान यांचे उज्जैन मध्ये महांकालेश्वरचे दर्शन – रुद्राभिषेक
- Assembly Elections : उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये निवडणुका कधी होणार?, निवडणूक आयोग दुपारी 3.30 वाजता जाहीर करणार तारखा
- GOOD NEWS : Atal Pension Scheme- खुशखबर ! केंद्र सरकारची हमी – नाही पडणार पैशांची कमी ! पती-पत्नी दोघांनाही मिळणार दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत पेन्शन
- सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला झाली कोरोणाची लागण
- मुंबई : महापुरुषांच्या पुतळ्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत्री उभारा ; शिवसेनेने महापालिकेकडे केली मागणी