• Download App
    Shiekh Hasina resigns as Bangladesh PM विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जमाते इस्लामी + अन्य दहशतवादी संघटनांचे बांगलादेशात थैमान

    विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जमाते इस्लामी + अन्य दहशतवादी संघटनांचे बांगलादेशात थैमान; शेख हसीनांची राजवट उधळली!!

    हिंसाचाराच्या आगडोंबातल्या बांगलादेशावर लष्कराचा ताबा; पंतप्रधान शेख हसीना भारताच्या आश्रयाला!! Shiekh Hasina resigns as Bangladesh PM

    वृत्तसंस्था

    ढाका : आरक्षणा विरोधातल्या विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली पाकिस्तान धार्जिणी जमाते इस्लामी आणि अन्य संघटनांच्या दहशतवाद्यांनी बांगलादेशातल्या रस्त्या रस्त्यांवर थैमान घातले. हे दहशतवादी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसले. तिथे लुटमार केली. शेख हसीनांची राजवट उधळून टाकली.

    बांगलादेशमध्ये मोठा राजकीय राडा झाला. हिंसाचाराच्या आगडोंबात होरफळलेला बांगलादेश सोडून पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल व्हावे लागले.

    बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी शेख हसीना यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला नकार दिला. उलट त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. बांगलादेशी लष्कराने त्यांना पंतप्रधान निवासस्थानातून निघून जाण्यासाठी काही कार्स आणि हेलिकॉप्टर पुरवली. त्या हेलिकॉप्टर मधून शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रिहाना या भारतीय हद्दीत दाखल झाल्या.

    याच दरम्यान विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जमाते इस्लामी आणि बाकीच्या पाकिस्तान धार्जिण्या संघटनांचे दहशतवादी पंतप्रधान यांच्या निवासस्थानात घुसून लुटमार करत होते. पंतप्रधान यांच्या निवासस्थानातून या लुटारूंनी तिथले फर्निचर, किचनमधले सामान लुटले. काही दहशतवाद्यांनी बांगलादेशातल्या रस्त्यांवरच्या वंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या पुतळ्यावर चढून त्याची विटंबना केली. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या ताब्यात घेतली.

    शेख हसीना यांचे हेलिकॉप्टर भारतातील त्रिपुरा येथील आगरतळा विमातळावर लँड

    बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव आणि हिंसाचार सुरु आहे. देशाातील लोकांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली आहे.  20 लाख लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करत असल्याच्या घोषणेनंतर बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले.

    शेख हसीना यांनी हेलिकॉप्टरमधून देश सोडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  शेख हसीना यांचे हेलिकॉप्टर भारतातील त्रिपुरा येथील आगरतळा विमातळावर लँड झाले. तिथून ते पाटण्यामार्गे दिल्लीकडे आले.

    बांगलादेशातील हिंसाचारामागे तिथला विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी त्याचबरोबर जमाती इस्लामी अशा संघटना आहेत. त्यांना बांगलादेशात स्थिर सरकार नको आहे त्याचबरोबर चीन आणि अमेरिकेतल्या काही विशिष्ट शक्ती देखील बांगलादेशाच्या हिंसाचाराला चिथावणी देत असल्याचे दिसून येते, असे भारताचे बांगलादेश मधले माजी राजदूत आणि माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रांग्रीला यांनी स्पष्ट केले.

    Shiekh Hasina resigns as Bangladesh PM

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र