• Download App
    किटेक्स ग्रुप केरळ सोडून गेल्याने शशी थरुर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, गुंतवणूक राज्यातून परत जाण्यासाठी कम्युनिस्ट सरकारचे सर्व प्रयत्न|Shashi Tharoor attacks state government after Kitex Group leaves Kerala, all efforts of communist government to return investment from the state

    किटेक्स ग्रुप केरळ सोडून गेल्याने शशी थरुर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, गुंतवणूक राज्यातून परत जाण्यासाठी कम्युनिस्ट सरकारचे सर्व प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    तिरुअनंतपूरम : केरळमधील मोठा उद्योग असलेला किटेक्स गु्रप राज्यातून परत गेल्यामुळे कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. कम्युुनिस्ट पक्षाचे सरकार राज्यातून गुंतवणूक परत जावी यासाठी सर्व तेप्रयत्न करत आहेत. त्यामुळे उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास तयार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.Shashi Tharoor attacks state government after Kitex Group leaves Kerala, all efforts of communist government to return investment from the state

    थरुर म्हणाले, तुमचे राजकारणकाहीही असो पण तुमच्या धोरणांमुळे राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. कोणताही उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास तयार नाही. त्यामुळे तरुणांच्या रोजगाराच्या संधी कमी होत आहे. किटेक्स ग्रुप राज्याबाहेर गेल्याचे दु:ख मोठे आहे. इरम ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सिद्दीक अहमद यांचे एक पत्रही थरुर यांनी सार्वजनिक केले आहे. यामध्ये अहमद यांनी म्हटले आहे की केरळ सरकार आणि किटेक्स यांनी सामोपचाराने चर्चा करून आपल्यातील वाद मिटवावा.



    राज्यातील मोठा कापड उद्योग असलेल्या किटेक्स ग्रुपने केरळमधील ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा राज्या किटेक्स गुंतवणूक करणार आहे. केरळ सरकारच्या सूडबुध्दीच्या राजकारणामुळेच किटेक्स ग्रुपने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

    किटेक्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक साबू जेकब यांनी नुकतीच केरळ सरकारवर टीका करताना म्हटले होते की सरकारची धोरणे ही पन्नास वर्ष जुनी आहे. सरकारकडे अनेक तक्रारी मांडूनही प्रतिसाद मिळाला नाही. उलट उद्योग मंत्री आर. राजीव यांनी त्यांच्यावरच अ्रारोप केले. केरळ सरकारने आपल्या शेजाऱ्याकडून धडे घेण्याची गरज आहे. अन्यथा केरळ हे उद्योगांची दफनभूमी बनेल.

    केरळमधील प्रमुख उद्योगसमूह असलेल्या किटेक्स गारमेंटस लिमिटेडची केरळमधील कम्युनिस्ट सरकारकडून छळवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. एक महिन्यात या उद्योगावर दहा वेळ छापे घातले गेले. ४० ते ५० अधिकारी एकाच वेळी कारखान्यात प्रवेश करतात.

    अनेक वेळा अगदी महिला कामगारांनाही त्रास देतात असा आरोप किटेक्स ग्रुपने केला होता. हे सरकार उद्योजकांना आत्महत्या करायलाच भाग पाडेल असे सांगत किटेक्स ग्रुपचे अध्यक्ष साबू जेकब यांनी केरळमध्ये सध्याच सुरू असलेले उद्योग सुरू ठेवणेच जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे आपली साडेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मागे घेण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

    कोची येथे गेल्या २६ वर्षांपासून किटेक्स ग्रुप काम करत आहेत. सुमारे दहा हजार कामगार येथे काम करतात. परंतु, तरीही केरळ सरकार सूडबुध्दीने वागत आहे. त्यामुळे आम्हाला कारखाना बंद करणे किंवा दुसऱ्या राज्यात हलविल्याशिवाय पर्याय नाही असेही जेकब म्हणाले होते. जेकब यांनी सांगितले, मी जवळजवळ तयार होतो आणि बहुतांश प्रकल्प अहवाल तयार होता. दुदैर्वाने मी पुढे जाऊ शकत नाही.

    यासाठी केरळ सरकारला प्रश्न विचारण्याची गरज आहे. जर मी काही चूक केली असेल तर त्या सुधारण्यास मी तयार आहे. त्गेल्या एक महिन्यापासून सरकारी अधिकाºयांनी आमच्या फर्ममध्ये बेकायदेशीर तपासणी केली आहे. ते येथे येऊन त्रास देतात. केरळ उच्च न्यायालयात या संदर्भात स्थगिती असल्याने आम्ही किमान वेतन देत नाही असा चुकीचा आरोप आमच्यावर करत आहेत.

    एका बाजुला सरकार कामगारांना किमान वेतन दिले जात नाही असे सरकारकडून म्हटले जात असले तरी कामगारांनी कंपनीच्या बाजूने आंदोलन करून सरकारच्या आरोपातील फोलपणा दाखवून दिला होता. कामगारांची लोकशाही म्हणविणाऱ्या केरळमधील कम्युनिस्ट सरकारच्या विरोधाता आता कामगारांनीच एल्गार पुकारला आहे. कम्युनिस्ट सरकारकडून किटेक्स ग्रुपच्या होत असलेल्या छळवणुकीविरोधात कामगारांनी निषेध आंदोलन उभे केले होते. व्यवस्थापनाला पूर्ण पाठिंबा देत कामगार रस्त्यावर उतरले होते.

    Shashi Tharoor attacks state government after Kitex Group leaves Kerala, all efforts of communist government to return investment from the state

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!