विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता “तिघांच्या” विरोधात बंडखोरीचा पवित्रा घेणाऱ्या नेत्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.कपिल सिब्बल यांनी काल काँग्रेस हायकमांडवर टीका केल्यानंतर त्यांच्या विरोधात काँग्रेस समर्थकांनी घोषणाबाजी केली. त्यांच्या बंगल्यासमोर टोमॅटो फेकले. त्यांच्या गाडीवर उभे राहून गाडीच्या काचा फोडल्या.Shashi Tharoor and Manish Tiwari also sided with Kapil Sibal
या पद्धतीची गुंडगिरी लोकशाही मानणार्या काँग्रेसमध्ये कशी काय खपवली घेऊन घेतली जाते?, असा सवाल काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केला आहे. हे योग्य नसल्याचे देखील त्यांनी काँग्रेस हायकमांडला सुनावले आहे.
त्यांच्या सुरात सूर काँग्रेसचे दुसरे खासदार शशी थरूर यांनी मिसळला आहे. आपण जर काँग्रेसला लोकशाहीवादी पक्ष म्हणतो तर कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानासमोर घडलेली गोष्ट आपण स्वीकारता कामा नये. तुम्ही त्यांच्याशी सभ्य भाषेत मतभेद व्यक्त करू शकता.
त्यांचे म्हणणे तुम्हाला मान्य नसेल तर त्याला विरोधही करू शकता. परंतु घोषणाबाजी आणि घरासमोर जाऊन गोंधळ काढणे हे लोकशाही मानणार्या पक्षाला शोभत नाही, अशा शेलक्या शब्दांत शशी थरूर यांनी काँग्रेस हायकमांडच्या समर्थकांना सुनावले आहे.
काँग्रेस कार्यकारिणीची लवकरच बैठक
एकापाठोपाठ एक मोठे नेते तीन गांधींविरोधात उभे राहत असल्याचे यातून मानले जात आहे. त्यामुळेच कदाचित काँग्रेस हायकमांडने लवकरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलवण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. रणदीप सुरजेवाला यांनी g-23 नेत्यांचा हवाला देऊन काँग्रेस कार्यकारिणीची बैठक लवकरच होईल असे स्पष्ट केले आहे.
Shashi Tharoor and Manish Tiwari also sided with Kapil Sibal
महत्त्वाच्या बातम्या
- महापौर किशोरी पेडणेकर : दोन डोस घेऊनही केईएम रुग्णालयात २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
- पुण्यात कोरोनाविरोधी लस आहे; पण, सिरींज नाहीत १७ हजार डोस उपलब्ध असताना द्यायचे ते कसे ?; महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच
- गोव्यात काँग्रेस परिवार एकत्र, पण मतांची मात्र विभागणी!!; मग पराभव कुणाचा?
- राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित द्या नवनीत राणांनी यांचा केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आग्रह