वृत्तसंस्था
अयोध्या : शरयू तीरावरी अयोध्या मनूनिर्मित नगरी बारा लक्ष दीपांनी लखलखली!! अयोध्या रामनगरीत आज बुधवारी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दीपोत्सव सकाळपासून सुरू झाला असून यामध्ये १२ लाख मातीच्या पणत्या लावण्यात आल्या आहेत.Sharyu Tiravari Ayodhya is a man-made city Twelve lakh lights flickered
त्यामुळे आज रामाची नगरी म्हणून ओळख असलेल्या अयोध्येत १२ लाख पणतीच्या रोषणाई लखलखताना दिसते आहे. रामनगरीत आजच्या दीपोत्सव २०२१ च्या माध्यमातून एका नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. अयोध्येत १२ लाख दिव्यांच्या रोषणाईची नोंद आणि मोजणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करत आहे.
आज सकाळपासूनच अयोध्येत रामाच्या चरणी ९ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत. रामजन्मभूमी परिसरात ५१ हजार दिवे, प्राचीन मंदिरे आणि इतर ठिकाणी ३ लाखांहून अधिक दिवे लावले आहेत. इतकेच नाही तर अयोध्येशिवाय बस्ती जिल्ह्यातील माखोडा धामसह ८४ कोसी परिक्रमेत येणाऱ्या अनेक ठिकाणी दिवे प्रज्वलित करण्यात आले आहे.
अयोध्येत यंदा लावल्या जाणाऱ्या दिव्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहेत. सकाळी १० वाजता प्रभू रामाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी उपस्थित होते. तसेच राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजर होते. या कार्यक्रमात राम-सीतेचे हेलिकॉप्टरने आगमन, भरत मिलाप, रामायण चित्र प्रदर्शनाचे देखील उद्घाटन करण्यात आले.
यंदाचा दीपोत्सव भव्य स्वरूपात
२०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. पहिल्या वर्षी १ लाख ८० हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. २०१८ मध्ये ३ लाख १ हजार १५२, तर २०१९ मध्ये ५ लाख ५० हजार आणि २०२० मध्ये ५ लाख ५१ हजार आणि यंदा २०२१ हे योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळाचे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा दीपोत्सव भव्य स्वरूपात साजरा होत आहे.
Sharyu Tiravari Ayodhya is a man-made city Twelve lakh lights flickered
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान