विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या डायऱ्यांवर आधारित लिहिलेले पुस्तक प्रणव माय फादर : अ डॉटर रिमेंबर्स सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचे ठरले आहे. त्यामध्ये प्रणव मुखर्जींनी राहुल गांधींवर केलेली टीका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची केलेली स्तुती या दोनच मुद्द्यांवर माध्यमांनी भर देऊन त्या पुस्तकाची प्रसिद्धी चालवली आहे. Sharmistha Mukherjee’s Statement Quoting Modi
पण त्या पलीकडे जाऊन प्रणव मुखर्जींच्या डायऱ्यांमध्ये आणि त्या पुस्तकांमध्ये भरपूर राजकीय आणि सामाजिक कमेंट्सचा खजिना आहे. हा खजिना प्रणव मुखर्जींच्या कन्या आणि पुस्तकाच्या लेखिका शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वेगवेगळ्या मुलाखतींमधून उलगडून सांगितला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हार्डवर्क विषयी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना नेहमीच कौतुक वाटत होते. त्याबद्दल त्यांची नेहमी बातचीतही होत असे. अशाच एका गप्पांमध्ये मोदींना आपण त्यांच्या काँग्रेसमुक्त भारत धोरणाविषयी विचारले असता त्यांनी एक वेगळीच माहिती दिल्याचे शर्मिष्ठा मुखर्जींनी सांगितले.
शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या की, मोदींनी त्यांना 1969 मधल्या काँग्रेस फुटीबद्दल माहिती दिली. त्यावेळी मोदी एक सर्वसाधारण कार्यकर्ताच होते. त्याच सुमारास एकदा ते गोळवलकर गुरुजींकडे गेले होते. गुरुजी त्यावेळी खूप अस्वस्थ होते. काँग्रेसमध्ये फूट पडली हे चांगले झाले नाही. देशाला अखंड आणि सक्षम काँग्रेसची गरज असताना ही फूट पडली ही घटना चांगली झाली नाही, असे गुरुजींनी आपल्याला सांगितल्याचे मोदी म्हणाले होते.
ज्यावेळी काँग्रेस सशक्त आणि समर्थ होती त्यावेळी विरोधी पक्ष कमकुवत होता. आज भाजप सक्षम आहे, त्यावेळी विरोधी पक्ष कम होत आहे. परंतु देशाला विरोधी सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, ही वस्तुस्थिती मोदींनी मान्य केली. त्याचवेळी काँग्रेसला सशक्त करण्याचे काम भाजपचे नाही, असेही त्यांनी आपल्याला सांगितल्याचे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
गोळवलकर गुरुजींच्या अनेक विचारांवर काँग्रेस नेहमी आक्षेप घेत असते, पण त्या काँग्रेस विषयी गुरुजींचे नेमके विचार काय होते??, यावर शर्मिष्ठा मुखर्जींनी मोदींच्या हवाल्याने केलेल्या वक्तव्यातून प्रकाश पडतो.
Sharmistha Mukherjee’s Statement Quoting Modi
महत्वाच्या बातम्या
- 24 जानेवारीला तज्ज्ञ वकिलांची फौज कोर्टात बाजू मांडणार, मराठा समाजाला न्याय मिळेल, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही
- DMK नेत्याची हिंदी भाषकांविरुद्ध गरळ; उत्तर प्रदेश, बिहार मधले लोक तामिळनाडूत येऊन टॉयलेट साफ करतात!!
- सगळेच प्रभारी बदलून काँग्रेसने टाकली “कात” की प्रियांकांना करून दिला “एस्केप रूट”??
- अखनूरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; जवानांनी एका घुसखोर दहशतवाद्याला केलं ठारं, तिघांनी काढला पळ