वृत्तसंस्था
नवी दिल्ली – दिल्लीत दंगल भडकवणारा आरोपी शरजिल इमाम याच्या भाषणातून देशाच्या सार्वभौमत्वालाच आव्हान एवढेच नाही तर एका समूदायाचा व्देषही त्याने पसरवला, असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी दिल्ली कोर्टात केला. त्याच्या भाषणाची भडकावू भाषणाची अनेक उदाहरणे त्यांनी कोर्टात पेश केली. Sharjeel Imam Challenged Sovereignty Of India, Tried To Imbibe Sense Of Hopelessness In Muslims”: Prosecution Tells Delhi Court In Riots Case
सरकारी वकील अमित प्रसाद म्हणाले की आपण काय बोलतो आहोत, याची शरजिलला पूर्ण जाणीव होती आणि आहे. त्याच्या भाषणाची सुरूवात अस्सलाम आलेकुमनं केली यावरूनच त्याचा हेतू सिद्ध होतो, याकडेही वकिलांनी लक्ष वेधले. अस्सलाम आलेकुम हे संबोधन एका समुदायाला उद्देशून होते, यावरून त्याचे हेतू स्पष्ट होतात, असे अमित आनंद यांनी स्पष्ट केले.
शरजिल उत्तम शिकलेला आहे. इमामचे जामिया मिलिया इस्लामिया आणि विशेषत: जानेवारी २०२० मध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठात दिलेली भाषणे एका विशिष्ट समुदायासाठी होती. शरजिल हा काही साधारण पार्श्वभूमी असलेल्या आरोपी नाही. तो पॉकेटमार, ड्रग्स तस्करी करणारा नाही. तो चांगला वक्ता आहे. त्याची भाषणे भडकावू असतात. त्याला पाच भाषांचे ज्ञान आहे.
त्याच्या जामिया विद्यापीठ आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील भाषणे पाहिली आणि ऐकली तर त्यातून तीन गोष्टी स्पष्ट होतात. एका विशिष्ट समुदायाला चेतवण्यासाठी त्याने ती भाषणे केली आहेत. त्यातून त्याला देशात अराजकताच पसरवायची आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान द्यायचे आहे आणि एका विशिष्ट समूदायाला लक्ष्य करायचे आहे, असा युक्तिवाद देखील अमित आनंद यांनी कोर्टात केला.
याआधी शरजिल इमामच्या वकिलांनी त्याच्या जामीनासाठी जोरादार युक्तिवाद केला होता. शरजिलची भाषणे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात होती. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे तो देशद्रोह ठरू शकत नाही, असा दावा इमामच्या वकिलांनी केला होता.