• Download App
    आईपणाचा अनुभवा शेअर करताना अनुष्का शर्मा म्हणतेय ; परफेक्ट बॉडी या गोष्टीला ग्लोरिफाय करणे थांबवले पाहिजे | Sharing motherhood experience, Anushka Sharma says; we should stop glorifying Perfect body thing

    आईपणाचा अनुभवा शेअर करताना अनुष्का शर्मा म्हणतेय ; परफेक्ट बॉडी या गोष्टीला ग्लोरिफाय करणे थांबवले पाहिजे

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : असं म्हणतात की मातृत्व हे स्त्रीला लाभलेले सर्वात मोठे वरदान आहे. आणि हे सत्यही असावे कदाचित. पण एखादी स्त्री जेव्हा एका बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या फक्त शारीरिक अवस्थेमध्येच बदल होतात असे नाही. तर तिच्या मानसिक अवस्थेमध्ये देखील बरेच बदल घडून येतात.

    Sharing motherhood experience, Anushka Sharma says; we should stop glorifying Perfect body thing

    नुकतीच आई झालेली अनुष्का शर्मा हिने एका मुलाखतीमध्ये आपला आई बनण्याचा अनुभव शेअर केला आहे. ती म्हणते, माझी बॉडी अधि टोन्ड होती. तशी अजिबात नाहीये. प्रेग्नन्सी नंतर बॉडीमध्ये बरेच बदल घडून आलेले आहेत. पण तरीही मला आता अतिशय सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटतं. एक मुलगी म्हणून आपल्याला सतत प्रेशर असतं की, मुलींनी सुंदरच दिसावं. परफेक्ट शेपमध्ये राहावं. पण बऱ्याच वेळा असे होते की परफेक्ट शेपमध्ये, बॉडीमध्ये असणार्या मुलींना देखील कॉन्फिडन्सची कमतरता जाणवत असते. तर कधी कधी (सो कॉल्ड) जाड मुली देखील कॉन्फिडंट असतात. त्यामुळे परफेक्ट बॉडी या गोष्टीला ग्लोरिफाय करणे थांबवले पाहिजे. मी माझ्या मुलीला वाढवताना तू एक स्त्री आहेस म्हणून असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे असं अजिबात शिकवणार नाही.

    https://www.instagram.com/p/CKvOEpOpEG_/?utm_source=ig_web_copy_link


    अनुष्का शर्माचे मास्क न घालणाऱ्यांना विशेष आवाहन, काय सांगितले अभिनेत्रीने ?


    आपल्या बोल्ड अँड परफेक्ट स्टेटमेंट मुळे अनुष्का नेहमी चर्चेत असते. प्रोड्युसर आणि अभिनेत्री असणारी अनुष्काने कोणत्याही गॉड फादर विना बॉलिवूडमध्ये मोठे करियर बनवले आहे.

    Sharing motherhood experience, Anushka Sharma says; we should stop glorifying Perfect body thing

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक