वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी 2018 मध्ये ध्रुव राठीचा एक व्हिडिओ पडताळणी शिवाय आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केला आणि त्यावरच्या बदनामी खटल्यात त्यांना भर कोर्टात माफी मागावी लागली. Shared a video of Dhruv Rathi defaming the central government
भाजप आयटी सेलशी संबंधी अब्रुनुकसानीच्या प्रकरणात केजरीवालांना ही माफी मागावी लागली. त्यांनी आपली चुक मान्य केल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय संयोजकाने सुप्रीम कोर्टात दिली. अपमानजनक व्हिडिओ रीट्वीट करुन त्यांनी चूक केली, असे त्यांना कोर्टात म्हणावे लागले.
भाजप नेत्याकडून याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी ११ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. अब्रुनुकसानीचा दावा रद्द करावा यासाठी अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, हायकोर्टाने ती फेटाळली. त्यानंतर केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पण, त्यांना इथेही अद्याप दिलासा मिळाला नाही.
अब्रुनुकसानीचा दावा करणाऱ्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टाने विचारले की, केजरीवाल यांनी माफी मागितली असल्याने त्यांना खटला मागे घ्यायचा आहे का??, उत्तर देण्यासाठी तक्रारकर्त्याला ११ मार्चपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील सुनावणी घेण्यात येईल.
काय होते प्रकरण?
हे प्रकरण २०१८ मधील आहे. प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये भाजप सरकारविरोधात काही खोट्या गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. ही पोस्ट केजरीवाल यांनी रीट्वीट केली होती. त्यानंतर ‘आय सपोर्ट नरेंद्र मोदी’ नावाचे सोशल मीडिया पेज चालवणारे विकास संकृत्यायन यांनी केजरीवाल यांच्या विरोधातात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
केजरीवाल यांनी पुराव्यांची पडताळणी न करता केंद्र सरकारची बदनामी करणारा व्हिडिओ रीट्वीट केला. त्या विरोधात विकास संकृत्यायन यांनी केस दाखल केली होती याप्रकरणी हायकोर्टाने केजरीवाल यांना समन्स पाठवले. यात हायकोर्टाने कलम ४९९ अंतर्गत अपमानजनक मजकूर रीट्विट करणे गुन्हा असल्याचे म्हटले होते. ही केस केजरीवाल यांनी याच केस संदर्भात सुप्रीम कोर्टातील धाव घेतली पण तिथे त्यांना माफी मागावी लागली.
Shared a video of Dhruv Rathi defaming the central government
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांचे जनतेला खुले पत्र, भाजपसोबत जाण्याविषयी स्पष्ट केली भूमिका; मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास
- जरांगेंनी फडणवीसांची माफी मागावी, अन्यथा ओबीसी मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा!!
- जरांगेंची भाषा “राजकीय”, ठाकरे – पवारांच्या स्क्रिप्टनुसारच जरांगे बोलतात!!; शिंदे – फडणवीसांचे संयमी, पण ठाम प्रत्युत्तर!!