विशेष प्रतिनिधी
मुंबई : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळच्या जवळ येत असताना देशात आणि परदेशातही प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. लोक उस्फूर्तपणे असंख्य उपक्रम करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापालिकेच्या शाळांमध्ये प्रभू श्रीराम या विषयावर कथा, गीत, कविता, चित्रकला स्पर्धा सुरू होणार आहेत. मात्र, अशा स्पर्धा घ्यायला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोध केला आहे. Sharad Pawar’s tone mixed with that of MLA Raees Sheikh
हा देश सेक्युलर आहे. इथे एकाच धर्माचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबवू नये, असे म्हणत शरद पवारांनी प्रभू श्रीराम या विषयाबद्दल शाळांमध्ये विविध स्पर्धा भरवायला विरोध केला.
मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राम जन्मभूमी मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर पुढाकार घेऊन महापालिका शाळांमध्ये श्रीरामाच्या विषयी चित्रकला, कथा, कविता गायन अशा वेगवेगळ्या स्पर्धा भरवण्याचे ठरवण्याची सूचना मुंबई महापालिका आयुक्त यांना दिली. त्यानुसार 10 जानेवारी पासून या स्पर्धा सुरू होणार आहेत.
परंतु या स्पर्धांना पहिल्यांदा समाजवादी पार्टीचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी विरोध केला होता. रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून आपला विरोध देखील नोंदवला होता. पण आता ही स्पर्धा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना शरद पवारांनी आमदार राईस शेख यांच्या सुरात सूर मिसळत प्रभू श्रीराम यांच्या विषयीच्या वेगवेगळ्या स्पर्धांना विरोध केला आहे. हा देश सेक्युलर आहे. त्यामुळे एकाच धर्माचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवण्यात येऊ नये. आमच्या मनात हिंदू धर्म आणि रामाबद्दल आस्था आहे, तशीच इस्लाम आणि मोहम्मद पैगंबर तसेच ख्रिस्ती धर्म आणि येशू ख्रिस्त यांच्याविषयी देखील आस्था आहे. त्यामुळे एकाच धर्माचे महत्त्व सांगणारे उपक्रम शाळांमध्ये राबवणे बरोबर नाही, असे शरद पवार म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी एकच वादग्रस्त वक्तव्य केले. परंतु ते बोलले नसते तरी चालले असते. अर्थात वाल्मीकि रामायण त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांनी रामाची अवहेलना केली असे मानण्याचे कारण नाही, अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचे समर्थन केले.
Sharad Pawar’s tone mixed with that of MLA Raees Sheikh
महत्वाच्या बातम्या
- बांगलादेशात शेख हसीनांचे सत्तेत पुनरागमन, पाचव्यांदा पंतप्रधान म्हणून निवड!
- INDIA आघाडीत फूट? जागावाटप झालेले नसताना केजरीवालांकडून उमेदवाराची घोषणा
- “जुना भारत” समजून खेळायला गेले कुस्ती; मोदींच्या नव्या भारताने उतरवली मालदीवची मस्ती!!
- टीएमसी नेत्याविरोधात जारी केलेल्या लुकआउट नोटीसीवरून काँग्रेसची खोचक टिप्पणी