• Download App
    पंतप्रधानांची पातळी घसरली म्हणणारे पवार अजितदादांना म्हणाले, "बालबुद्धी"; मोदींना म्हणाले, "पोरकट"!! मग स्वतः पवार कोण?? Sharad pawar targets PM Modi with abusive language

    पंतप्रधानांची पातळी घसरली म्हणणारे पवार अजितदादांना म्हणाले, “बालबुद्धी”; मोदींना म्हणाले, “पोरकट”!! मग स्वतः पवार कोण??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  पंतप्रधानांच्या प्रचाराची पातळी घसरली आहे, असे म्हणणारे शरद पवार आधी अजित पवारांना म्हणाले “बालबुद्धी” आणि आता थेट मोदींनाच म्हणाले “पोरकट”!! पण त्यामुळे स्वतः पवार कोण आणि कसे ??, असा सवाल तयार झाला आहे. Sharad pawar targets PM Modi with abusive language

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “नकली शिवसेना” आणि “नकली राष्ट्रवादी” अशी टीका केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीला नकली म्हणणे हा पोरकटपणा आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. झी २४तासच्या मुलाखतीत पवारांनी केवळ ते पंतप्रधान आहेत म्हणून मी मोदींना “पोरकट” म्हणणार नाही, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीला नकली म्हणणे हा पोरकटपणाचा आहे, असे खोचक प्रत्युत्तर दिले.

    याआधी पवारांनी अजित पवारांच्या टीकेवर उत्तर देताना त्यांना “बालबुद्धी” म्हटले होते. शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरण संदर्भात वक्तव्य केले होते त्यावर शरद पवार नेहमी संभ्रमावस्था निर्माण करणारी वक्तव्य करत असतात. तीच त्यांची कार्यपद्धती राहिली आहे, अशी टीका अजित पवारांनी शिरूर मध्ये केली होती. त्या टीकेला उत्तर देताना राजकारणात “बालबुद्धी” हे ज्यांचे वैशिष्ट्य आहे असे लोक असतात ते “बालबुद्धी”ने काहीतरी बोलत राहतात. त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचे??, असे प्रत्युत्तर पवारांनी दिले होते. त्यानंतर आज ते मोदींना “पोरकट” म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार “नकली शिवसेना” आणि “नकली राष्ट्रवादी” असा उल्लेख करत आहेत, असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, “पंतप्रधानांची पातळी कुठे गेली आहे हे यावरुन दिसत आहे. नकली शिवसेना म्हणण्याचे कारण काय?? शिवसेनेतील एक गट शिंदेंच्या बाजूने गेला, हे आपण समजू शकतो. आज मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो असता, अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडणारे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसैनिक दिसतात. त्यांनी एक आव्हान स्वीकारले आहे. सर्व शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन समाजकारण, राजकारणासाठी उतरले आहेत. मी पंतप्रधानांसाठी तो शब्द वापरणार नाही. पण दुसरे कोणी असते तर नकली म्हणणे म्हणजे “पोरकटपणा” आहे असे म्हटले असते.

    नकली राष्ट्रवादी आहे का हे निवडणुकीतून कळेलच असा सूचक इशाराही शरद पवारांनी यावेळी दिला. शरद पवारांनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगाला हाताशी धरुन पंतप्रधानांना आपल्या सोयीची निवडणूक टप्प्यांची आखणी केली, असा गंभीर आरोप शरद पवारांनी केला.

    पवारांना मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर

    शरद पवारांच्या या आरोपावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले, निवडणुकीत पराभव दिसतोय. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर जेव्हा ते पंतप्रधान होणार असल्याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या तेव्हा अशी कारणे मुलाखतीत दिली जातात. 1952 मध्ये पहिली निवडणूक झाली, तेव्हा देशात काँग्रेसचे वातावरण होते. ही निवडणूक 25 ऑक्टोबर ते 21 फेब्रुवारी अशी 4 महिने चालली होती. तेव्हाही अशाच प्रकारे काही लोकांनी आरोप केले असून आता त्याची “री” ओढली जात आहे. पंडित नेहरुंच्या सोयीसाठी 4 महिने निवडणूक झाली असं सांगितलं. पण तेव्हा पंडित नेहरु आणि निवडणूक आयोगाने देशातील विविधता, आवश्यकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने नीट आणि निष्पक्ष व्हावी यासाठी 4 महिने घेतल्याचे सांगितले होते.

    पंतप्रधानांसाठी पोरकटपणा शब्द वापरणं म्हणजे शरद पवार आता संजय राऊतांच्या मार्गावर निघालेत असेच म्हणावे लागेल. शरद पवार मोठे नेते असून, त्यांनी पंतप्रधानांबद्दल बोलताना पोरकटपणा शब्द वापरण्याऐवजी “नकली राष्ट्रवादी” नाही, इतकेच बोलायला हवे  होते. आता जर एखाद्याने शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले तर भाजपा पदाधिकाऱ्याची जीभ घसरली असे म्हणू नका. पवारांनी मूळात संयमाने उत्तर देणे अपेक्षित होते.

    Sharad pawar targets PM Modi with abusive language

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!