विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस वरील ताब्याच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सलग दुसऱ्या सुनावणीत खासदार शरद पवार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे तीन महत्त्वाचे नेते हजर राहिले. पहिल्या सुनावणीच्या आधी शरद पवार मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून आले होते. आज सलग दुसऱ्या सुनावणीत शरद पवार प्रत्यक्ष हजर होते. Sharad Pawar present in second consecutive hearing of Election Commission
यावेळी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंगवे यांनी अजित पवार गटावर वेगळा आरोप केला. अजित पवार गटाने निवडणूक आयोगात सादर केलेली तब्बल 20000 प्रतिज्ञापत्रे खोटी आहेत. त्यातली बहुतांश प्रतिज्ञापत्रे अल्पवयीन मुलांची आहेत. त्यामध्ये अनेक कायदेशीर त्रुटी आहेत हे निवडणूक आयोगाच्या निदर्शनाला आणून दिल्याचे अभिषेक मनू सिंघवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अजित पवार गटाने निवडणूक आयोगात सादर केलेल्या 20000 खोट्या प्रतिज्ञापत्रांमधल्या तब्बल 8900 खोट्या प्रतिज्ञापत्रांचा चार्ट बनवून निवडणूक आयोगाला सादर केल्याचेही ते म्हणाले.
पवार सलग दुसऱ्यांदा हजर, रहस्य काय??
मात्र निवडणूक आयोगातल्या सुनावणीत सलग दुसऱ्यांदा स्वतः शरद पवारांची उपस्थिती ही बाब वैशिष्ट्यपूर्ण ठरली. राष्ट्रवादी फुटली, त्याआधी शिवसेना फुटली. राष्ट्रवादीची सुनावणी जशी निवडणूक आयोगात होत आहे, तशी सुनावणी शिवसेनेच्या बाबतीतही झाली. परंतु त्या सुनावणीच्या वेळी उद्धव ठाकरे स्वतः रस घेऊन निवडणूक आयोगात हजर राहिले नव्हते. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, परंतु तेथे देखील स्वतः उद्धव ठाकरे कोणत्याही सुनावणीच्या वेळी हजर नव्हते.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टातली राष्ट्रवादीच्या बाबतीतली कायदेशीर लढाई शरद पवारांनी अधिक गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच पहिल्या सुनावणीनंतर आज सलग दुसऱ्या सुनावणीत स्वतः शरद पवार निवडणूक आयोगात हजर राहिले.
शिवसेना – राष्ट्रवादीतला फरक
राष्ट्रवादीच्या बाबतीतला गंभीर पेचप्रसंग आणि शिवसेनेच्या फुटीचा गंभीर पेचप्रसंग यात सर्वात महत्त्वाचा फरक असा आहे, की राष्ट्रवादीतली लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार एवढ्या पुरती मर्यादित नसून ती अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी देखील आहे. त्यामुळे शरद पवारांच्या समोर मुलगी की पुतण्या हा गंभीर पेच आहे. या पेचाला शिवसेनेच्या फुटीच्या वेळी उद्धव ठाकरे यांना सामोरे जावे लागले नव्हते कारण राज ठाकरे आधीच शिवसेनेतून बाहेर पडून नवा पक्ष काढून बसलेत. शिवसेनेवरचा कब्जा हा ठाकरे परिवार आणि ठाकरे परिवाराबाहेरचा नेत्यांमधला वाद आहे.
कायदेशीर लढाई गांभीर्याने घेणे पवारांना भाग पडले
त्या उलट राष्ट्रवादीच्या कब्जाच्या वादात पुतण्या की मुलगी हा गंभीर पेचप्रसंग आहे. शरद पवारांना आपला राजकीय वारसा आपल्या मुलीकडे म्हणजे सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवायचा आहे. त्यामुळेच त्यांनी ही कायदेशीर लढाई गांभीर्याने घेतली आहे. किंबहुना ही लढाई गांभीर्याने घेण्याखेरीज पवारांपुढे पर्याय देखील नाही.
निवडणूक आयोगाने शरद पवारांना अनुकूल निर्णय दिला तर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्या होतील. पण विरोधात निर्णय दिला तर अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते ठरतील. पण सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्यासारखा शरद पवारांकडे कोणता राजकीय वारसा उरेल??, हा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या कब्जावरची कायदेशीर लढाई गांभीर्याने घेणे पवारांना भाग आहे आणि म्हणूनच ते निवडणूक आयोगाच्या सुनावणीत व्यक्तिगत पातळीवर उपस्थित राहात आहेत.
Sharad Pawar present in second consecutive hearing of Election Commission
महत्वाच्या बातम्या
- Mission Mahagram : ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि IDBI बँक यांच्यात सामंजस्य करार!
- जम्मू-काश्मीर : शोपियान चकमकीत TRF दहशतवादी ठार, दारूगोळा मोठ्याप्रमाणावर जप्त
- ”राहुल गांधी त्याच मंदिरात जातात जिथे बाबरचे…’ हिमंता बिस्वा सरमा यांचा जोरदार हल्लाबोल!
- ”अजून किती खालच्या पातळीवर जाल, जगभरात देशाला अपमानित करत आहात ” मोदींचा विरोधकांवर घणाघात!