• Download App
    राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाचे विष; राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल Sharad Pawar poisoned casteiest politics in maharashtra, alleges Raj Thackeray

    राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाचे विष; राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

    प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाचे विष पेरले, असा हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला आहे. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळमध्येही ते बैठका घेणार आहेत. सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. Sharad Pawar poisoned casteiest politics in maharashtra, alleges Raj Thackeray

    छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जातीच्या चष्म्यातून बघण्याच्या जात या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ साली झाली तेव्हापासून महाराष्ट्रात त्यांनी जातीचे राजकारण सुरू केल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी अधोरेखित केला आहे.

    राज ठाकरे सध्या दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी कोल्हापुरात इतिहासकार जयसिंगराव पवार यांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. सावंतवाडी मध्ये आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज ठाकरे यांचे भेट घेतली.

    काय म्हणाले राज ठाकरे?

    शरद पवार तेव्हा कधीच शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे नाहीत. ‘फुले-शाहू-आंबेडकर’ हा विचार आहे, असे शरद पवार सांगतात. मग तेव्हा ‘शिवाजी महाराज’ हा विचार नव्हता का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मूळ विचार हा शिवरायांचा आहे. परंतु, शिवरायांचे नाव घेतले की मुसलमानांची मते जातात, म्हणून नाव घेणे टाळले जाते, इतर समाज आणि मराठा समाजात फूट पाडायची म्हणजे हेही खिशात आणि तेही खिशात असे, राष्ट्रवादीने राजकारण केले असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

    राज ठाकरे म्हणाले, शिवरायांचे नाव घेतले तर मुसलमानांची मते जातात. त्यामुळे कोणत्या तरी टोळ्या फंडिग गोळा करण्यासाठी उभ्या केल्या जातात. १९९९ पासून महाराष्ट्रात हे विष राष्ट्रवादी कॉंग्रेसने कालवले, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला, तर राहुल गांधींनी वीर सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, राहुल गांधींना सावरकरांचा विषय काढण्याचा काही संबंध होता का??, कोणीही उभे राहतं आणि काहीही बोलते. त्याला तुम्ही नको ती प्रसिद्धी देत असता, त्यामुळे हे घडतंय, असा आरोप राज ठाकरेंनी केला.

    Sharad Pawar poisoned casteiest politics in maharashtra, alleges Raj Thackeray

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!