विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यातले मुख्य आरोपी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेसाठी आम आदमी पार्टीने जंतर-मंतरवर केलेल्या धरणे आंदोलनात शरद पवार पोहोचले, पण आम आदमी पार्टीच्या आंदोलनात जाणे काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र जाणीवपूर्वक टाळले. त्यामुळे लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विरोधकांच्या इंडी आघाडीतली फुट जनतेसमोर आली. sharad pawar join the INDIA bloc protest over Arvind Kejriwal’s health and his illegal arrest.
अरविंद केजरीवालांचे तुरुंगात वजन घटले आहे. त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार केले जात नाहीत. त्यांची मूळात अटकच अवैध आहे, असे आरोप करत आम आदमी पार्टीने जंतर-मंतरवर धरणे आंदोलन आयोजित केले होते. त्याचे नेतृत्व अरविंद केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी केले. आंदोलनात दिल्लीतले सगळे मंत्री उपस्थित होते. या आंदोलनासाठी आम आदमी पार्टीने इंडी आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना निमंत्रण दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा आणि अन्य काही पक्षांचे नेते आम आदमी पार्टीच्या स्टेजवर पोहोचले. तिथे त्यांनी अरविंद केजरीवालांच्या सुटकेसाठी भाषणे देखील केली. परंतु दिल्लीतला सगळ्यात महत्त्वाचा पक्ष काँग्रेस मात्र या आंदोलनात कुठे दिसला नाही. किंबहुना काँग्रेस नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या स्टेजवर जाण्याचे टाळले.
मूळातच अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची आघाडी लोकसभेपुरतीच होती. विधानसभा निवडणुका हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आम आदमी पार्टी पासून विशिष्ट अंतर राखणेच पसंत केले. दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल मुख्य आरोपी आहेत. त्यांच्यावर सीबीआयने तसे चार्जशीट दाखल केले आहे. भाजप अरविंद केजरीवालांना त्या मुद्द्यावर घेरत असतोच. परंतु काँग्रेसचे नेतेही केजरीवालांवर शरसंधान साधण्यात मागे राहात नाहीत. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी आम आदमी पार्टी आंदोलन करत असेल, तरी आपण त्या पार्टीच्या स्टेजवर जाण्याचे कारण नाही, असा पोक्त राजकीय विचार काँग्रेस नेत्यांनी केला आणि ते आम आदमी पार्टीच्या स्टेजवर गेले नाहीत.
sharad pawar join the INDIA bloc protest over Arvind Kejriwal’s health and his illegal arrest.
महत्वाच्या बातम्या
- राजस्थानात गुरू-शिष्यांची जोडी! बागडे राज्यपाल, तर विधानसभेत यश मिळवून देणाऱ्या रहाटकर भाजप प्रभारी
- मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत पहिल्या रांगेतील स्थानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबासह पंतप्रधानांच्या भेटीला!!
- Manoj Jarange : काही नेत्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याची मनोज जरांगेंची अखेर कबुली; पण नेत्यांचे नाव सांगायला नकार!!
- Manu Bhakar : ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दिला होता धोका, पण यंदा तू…