विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांकडूनही अखेर उद्धव ठाकरेंच्या नावाला कात्री लागली. कारण त्यांनी काँग्रेसच्या धास्तीने कोल्हापुरात सामूहिक नेतृत्वाच्या सूत्राची पेरणी केली. Sharad pawar drops uddhav thackeray’s name for chief ministership due to fear of Congress
त्याचे झाले असे :
लोकसभा निवडणुकीमध्ये चांगला परफॉर्मन्स झाल्यानंतर महाविकास आघाडी आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उत्साह संचारला खरा, पण सुरुवातीलाच गाडी मुख्यमंत्रीपदावर अडली. त्यावेळी शरद पवारांनी सुरुवातीला उद्धव ठाकरेंचे नाव पुढे रेटून पाहिले. ठाकरे यांना महाराष्ट्रात सहानुभूती मिळाली आहे. त्याचा लाभ लोकसभेत मिळाला, तसाच लाभ विधानसभेत मिळू शकतो, असा त्यांचा होरा होता. पण मुख्यमंत्रीपदी ठाकरे आणि आपल्या हातात सूत्रे!!, हा त्यांचा खरा फॉर्म्युला होता.
परंतु, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत डबल डिजिट जागा मिळाल्याने पवारांचा होरा चुकला. उद्धव ठाकरेंच्या नावाला काँग्रेसने सुरुवातीला कोलदंडा घातला. विधानसभेला “ज्याच्या जागा जास्त, त्याचा मुख्यमंत्री”, हे सूत्र काँग्रेसने पुढे रेटले. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध शिवसेना संघर्ष सुरू झाला. संजय राऊत यांनी बिनचेहऱ्याची आघाडी नको. चेहरा पुढे करूनच आघाडीने निवडणुका लढवल्या पाहिजेत, असे मत व्यक्त करून उद्धव ठाकरेंच्या नावाची रिंग मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत टाकली. त्यामुळे आघाडी मोठा पेच तयार झाला. आघाडीतले दोन मोठे घटक पक्ष मुख्यमंत्री पदावरून आमने-सामने आल्यानंतर ज्या पक्षाला आघाडीची सर्वाधिक गरज आहे, तो शरद पवार यांचा पक्ष अडचणीत आला. त्यामुळे कोल्हापुरात शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सामूहिक नेतृत्वाच्या सूत्राची पेरणी केली. ठाकरे, काँग्रेस आणि आम्ही असे आघाडीत एकत्र आहोत. मुख्यमंत्रीपदासाठी आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे. सामूहिक नेतृत्व आहे आमचे सूत्र आहे, असे शरद पवार म्हणाले.
बाकी त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरून वगैरे शिंदे – फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पवारांनी कोल्हापुरातून उद्धव ठाकरेंच्या नावाला कात्री लावली. कारण त्यांनी काँग्रेसची धास्ती घेतली. मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसने जास्त ताणले, तर आघाडी तुटेल आणि त्याचा फटका काँग्रेस आणि शिवसेना यांना बसण्यापेक्षा आपल्या पक्षाला बसेल, याची धास्ती पवारांना वाटली म्हणून त्यांनी सामूहिक सूत्राची पेरणी केली
Sharad pawar drops uddhav thackeray’s name for chief ministership due to fear of Congress
महत्वाच्या बातम्या
- शिक्षणमंत्री म्हणाले- केंद्र सरकार NEETवर चर्चेस तयार; NTA मॉनिटरिंग कमिटीने पालक-विद्यार्थ्यांच्या सूचना मागवल्या
- बंगालच्या राज्यपालांचा ममतांवर मानहानीचा खटला; मुख्यमंत्री म्हणाल्या होत्या- महिला राजभवनात जायला घाबरतात
- येडियुरप्पांविरुद्ध लैंगिक शोषणाच्या खटल्यात 750 पानांचे आरोपपत्र दाखल; 75 जण साक्षीदार
- बहीण लाडकी सरकारची; होणार मतदार कोणाची??