नाशिक : शरद पवारांच्या शुभेच्छांनी मुलायम सिंग यादव यांच्या भाषणाची आठवण; राहुल गांधींचे दोन ओळींचे ट्विट, पण पवारांचे मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब!!, या तिन्ही गोष्टी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त घडल्या.
काँग्रेस सकट देशातल्या सगळ्या विरोधकांनी नरेंद्र मोदींच्या निवृत्ती या विषयाची चर्चा देशभर घडविली. पण वयाच्या 75 व्या वर्षी मोदी निवृत्त झाले नाहीत. त्या उलट त्यांनी नव्या ऊर्जेने कामाला सुरुवात केली. मध्य प्रदेशातून सशक्त नारी अभियान देशभर उभे केले. देशातल्या आणि परदेशातल्या बड्या नेत्यांनी मोदींना वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचा त्यामध्ये समावेश राहिला. युरोपियन युनियन मधल्या नेत्यांनी सुद्धा मोदींना शुभेच्छा दिल्या.
राहुल गांधी आणि पवारांच्या शुभेच्छा
या सगळ्या शुभेच्छांमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार यांनी दिलेल्या शुभेच्छा वेगळ्या ठरल्या. राहुल गांधी यांनी दोन ओळींचे ट्विट करून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांना चांगले आरोग्य लाभो, असे चिंतले.
मुलायम सिंग यांच्या भाषणाची आठवण
पण शरद पवारांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांच्या भाषणाची आठवण झाली. कारण पवारांनी मुलायम सिंग यांच्यासारखेच नरेंद्र मोदींच्या भविष्यकालीन नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या शेवटच्या संसद अधिवेशनात मुलायम सिंग यादव यांनी भाषण करून नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येवो, अशा शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी मुलायम सिंग यादव समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि लोकसभेतले गटनेते होते. समाजवादी पार्टीने भाजप विरोधात निवडणुका लढविल्या होत्या. दोन्ही पक्षांनी कधीच युती केली नव्हती. तरी देखील मुलायम सिंग यादव यांनी नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येवो, अशा लोकसभेतल्या भाषणातून शुभेच्छा दिल्याने त्यावेळी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती.
मोदींच्या नेतृत्वावर पवारांचे शिक्कामोर्तब
शरद पवारांनी आज नरेंद्र मोदींना 75 व्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवरून शुभेच्छा देताना त्यांच्या भविष्यकालीन नेतृत्वावर वेगळ्या भाषेत शिक्कामोर्तब केले. मोदीजी तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली दिवसेंदिवस भारताची प्रगती अशीच होत राहो. भविष्यकाळात देशाचे जास्तीत जास्त कल्याण होवो. देश प्रगती साधत राहो, अशी आशा मी व्यक्त करतो, असे शरद पवारांनी ट्वीटमध्ये नमूद केले. पवारांच्या या ट्विट मुळे मुलायम सिंग यांच्याच भाषणाची आठवण झाली. मुलायम सिंग यादव यांनी ज्या पद्धतीने भाजपशी युती न करता सुद्धा मोदींना पुन्हा पंतप्रधान बनायच्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्याच पद्धतीने पवारांनी मोदींना भविष्यकालीन नेतृत्वासाठी शुभेच्छा दिल्या. मोदी आणि मुलायम सिंग, तसेच मोदी आणि पवार यांच्या राजकीय गुळपीठातले साम्य (आणि काँग्रेसचा सुप्त विरोध) यानिमित्ताने समोर आले.
Sharad pawar and Rahul gandhi wishes pm Modi on his birthday
महत्वाच्या बातम्या
- PM Karki : नेपाळच्या पीएम कार्की यांना जेन-झी नेत्याचा इशारा- आमचे ऐकले नाही तर जिथून आणले तिथे फेकू
- अशिया कप मध्ये भारताविरुद्ध हरल्यानंतर पाकिस्तान्यांचा राग अनावर; शाहिद आफ्रिदीच्या पसंती क्रमात राहुल गांधी सगळ्यांत वर!!
- Gold Price : सोने तब्बल 1,029 रुपयांनी वाढून 1.11 लाखांच्या सर्वोच्च पातळीवर; चांदीचाही प्रति किलो ₹1.29 लाखांचा विक्रमी उच्चांक
- Pratap Sarnaik : शेतकऱ्यांच्या मुलांची पिळवणूक करणाऱ्या कला केंद्रांचे परवाने तात्काळ रद्द करा