काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरण्याची भाषा करणाऱ्या शरद पवारांवर पुतण्याच्या प्रादेशिक पक्षात स्व पक्ष विलीन करण्याची वेळ आली, ती सुद्धा अमित शहांच्या परवानगीने!! अशी राजकीय परिस्थिती शरद पवारांवर आज ओढवली.
या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी नव्या परिस्थितीचे विश्लेषण करणारे भाकित आणि भाष्य केले. महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आटोपल्यानंतर कदाचित शरद पवार हे अजित पवारांच्या पक्षात त्यांच्या पक्ष विलीनीकरण करून टाकतील. सगळ्या पक्षाची सूत्रे अजित पवारांकडे सोपवतील. सुप्रिया सुळे यांचे राजकीय बस्तान बसवतील. यासाठी अमित शाह यांची परवानगी आहे. ठाकरे ब्रँड धुळीस मिळाला, तसा पवार ब्रँड धुळीस मिळू नये, यासाठी अमित शाह त्यांना मदत करतील, असा माहितीपूर्ण दावा भाऊ तोरसेकर यांनी केला.
भाऊंच्या ज्येष्ठ पत्रकारांच्या दाव्यात किती तथ्य आहे आणि किती नाही, हे येणारा काळच सांगेल, पण ज्या शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फार मोठे राजकीय हवामान तज्ज्ञ म्हटले होते, त्या पवारांच्या राजकीय होऱ्यातली हवा दीड वर्षातच निघून गेली, हे मात्र 2025 च्या अखेरीस उघड्यावर आले.
– पवारांचा दावा काय होता??
2024 ची लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत पवारांनी फार मोठे राजकीय भाकित वर्तविले होते. आगामी काळात वेगवेगळ्या राज्यांमधले प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस पक्षामध्ये विलीन करावे लागतील. कारण काँग्रेसची ताकद वाढलेली असेल. कदाचित काँग्रेस प्रणित INDI आघाडी सत्तेवर आलेली असेल. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी होईल आणि प्रादेशिक पक्षांमधल्या नेत्यांना आपले राजकीय महत्त्व टिकवण्यासाठी आपापले प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावे लागतील, असा दावा त्यावेळी पवारांनी त्या मुलाखतीत केला होता.
याचा अर्थ स्वतःचा अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन करावा लागेल, याचीच कबुली त्यांनी अप्रत्यक्षपणे दिली होती.
– पवारांचा सगळा दावा फोल
पण पवारांचा हा राजकीय हवामान वर्तविण्याचा सगळ्या दावा गेल्या दीड वर्षांमध्येच फोल गेला. त्यांचा सगळाच अंदाज चुकला. मोदींनी त्यांना कितीही फार मोठे हवामान तज्ञ म्हटले असले, तरी प्रत्यक्षात पवारांचा अंदाज डब्यात गेला. पवारांच्या आधीच्या अंदाजानुसार काँग्रेस बळकट झाली, पण ती सत्तेवर येऊ शकली नाही. उलट गेल्या दीड वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने काँग्रेसला मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले. त्याचबरोबर कुठल्याही प्रादेशिक पक्षाने काँग्रेसमध्ये स्वतःचे विलीनीकरण करून घेतले नाही. खुद्द पवारांनी सुद्धा स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला नाही. त्या उलट त्यांचाच राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष फुटला. त्यांनाच अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवावे लागले.
– पटेल + तटकरे अमित शाहांच्या दारी
दीड वर्षांमध्येच अशी परिस्थिती उद्भवली, की काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची भाषा हवेत उडाली आणि पुतण्याच्या पक्षात स्वतःचा पक्ष विलीन करायची वेळ शरद पवारांवर आली. ती सुद्धा अमित शाह यांच्या परवानगीने राजकीय खेळी करायची वेळ आली. कारण महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जवळ केले, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर लोटले. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी एकाकी पडली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी किमान आपल्या दोन पक्षांनी आघाडी करावी, याचा जोरदार आग्रह धरला. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचे दोन नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाह यांच्याकडे fielding लावली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये तसेच काही जिल्हा परिषदांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेण्यासाठी अमित शाह यांची अगदीच परवानगी नाही, पण निदान संमती तरी मिळावी, अशी विनंती केली.
– राजकीय हवामान तज्ज्ञ failed
अमित शहा यांनी मोठ्या राजकीय भवितव्यावर डोळा ठेवत ती संमती दिली. स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, तर भाजपची हरकत नाही, असे अमित शहा म्हणाले. हा सगळा दावा भाऊ तोरसेकर यांनी केला. पण भाऊंचा दावा जरी खरा मानला, तरी मूळ पवारांचा सगळा दावा आणि राजकीय भाकीत मात्र पूर्णपणे फोल ठरले. फार मोठे राजकीय हवामान तज्ञ भवितव्याचा वेध घेण्यात अपयशी ठरले, ही वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही. दीडच वर्षांपूर्वी पवारांना आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायची वेळ येईल, असे वाटले होते. ती वेळ आली नाही. परंतु, स्वतःचा पक्ष त्यांना पुतण्याच्या पक्षात विलीन करायची वेळ आली आणि ती सुद्धा अमित शाह यांच्या संमतीने, ही राजकीय परिस्थिती पवारांवर ओढवली.
Sharad Pawar and Ajit Pawar may come together, but Amit Shah’s concent 1
महत्वाच्या बातम्या
- Sonia Gandhi, : सरकारने म्हटले- नेहरूंशी संबंधित कागदपत्रे सोनिया गांधींकडे; संसदेत संबित पात्रा यांनी हे गायब झाल्याचा आरोप केला होता
- Valmik Karad : वाल्मिक कराडला हायकोर्टाचा मोठा झटका; संतोष देशमुख हत्या प्रकरणात जामीन फेटाळला; ठोस पुराव्यांच्या आधारे महत्त्वपूर्ण निर्णय
- नेहरूंना सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान मान्य, पण त्यांना भारतरत्न द्यायला विरोध!!; पुरावा समोर
- माणिकरावांचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांच्या लेखी नैतिकतेची भाषा, पण पार्थच्या जमीन घोटाळ्यात नैतिकता टांगली खुंटीला!!