• Download App
    Shani Shingnapur Temple Removes Muslim Staff Hindutva Pressureशनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय;

    Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय; 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 जणांना नारळ; हिंदुत्ववादी संघटनांचा होता आक्षेप

    Shani Shingnapur

    विशेष प्रतिनिधी

    अहिल्यानगर : Shani Shingnapur  जिल्ह्यातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानने एक मोठा निर्णय घेतला असून, त्यांच्या १६७ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमागे हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव असल्याचा आरोप केला जात आहे, कारण या संघटनांनी नुकतीच या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा दिला होता.Shani Shingnapur

    महाराष्ट्रात विख्यात असलेल्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर मंदिरात ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी गत २१ मे रोजी कथितपणे मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर जाऊन ग्रिल बसवले होते. तसेच, तेथील स्वच्छता आणि रंगरंगोटीही केली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला होता. या संघटनांनी या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती आणि या प्रकरणी १४ जून रोजी मंदिराबाहेर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता.



    या इशाऱ्यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने ट्रस्टमध्ये ११४ मुस्लिम कर्मचारी काम करत असल्याचे मान्य केले होते. मात्र, त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केले होते की, एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याची नियुक्ती मंदिराच्या मुख्य चौथऱ्यावर किंवा गर्भगृहात करण्यात आलेली नव्हती. असे असले तरी, हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळेच हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

    हे कर्मचारी मुख्यतः शेती विभाग, कचरा व्यवस्थापन व शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत. 99 कर्मचारी मागील 5 महिन्यांपासून नोकरीवर अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचाही पगार बंद करण्यात आला आहे. उर्वरित 15 कर्मचारी अनेक वर्षांपासून ट्रस्टला आपली सेवा देत आहेत. यातील काहींचा अनुभव 20 वर्षांहून अधिकचा आहे, असे विश्वस्त मंडळाने म्हटले होते. पण या प्रकरणी देवस्थानवरील दबाव वाढल्यानंतर अखेर त्यांनी 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह एकूण 167 जणांना कामावरून कमी केले. या सर्वांवर अनियमितता व शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

    मंत्री नीतेश राणे यांनीही केली होती हकालपट्टीची मागणी

    उल्लेखनीय बाब म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी गुरूवारीच हिंदू संघटनांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची केलेली मागणी योग्यच असल्याचे विधान केले होते. हिंदू संघटनांनी केलेली मागणी योग्यच आहे. हाजी अली आणि अजमेर दर्ग्यात कृत्य कुणी करेल का? असे कृत्य फक्त आपल्या हिंदू धार्मिक स्थळांसोबतच का केले जाते? कोणताही हिंदू व्यक्ती कोणत्याही मुस्लिम धार्मिक स्थळात काम करताना दिसला तर हे लोक त्याला नक्कीच सोडणार नाहीत. परंतु, ज्या प्रकारे आपल्या हिंदू धार्मिक स्थळांच्या प्रतिष्ठेशी सतत छेडछाड केली जात आहे, ते आपण आता कोणत्याही किंमतीत स्वीकारू शकत नाही. कोणत्याही मुस्लिम संस्थेत तुम्हाला कोणताही हिंदू काम करताना दिसणार नाही, असे ते म्हणाले होते.

    दरम्यान, नीतेश राणे यांच्या या भूमिकेमुळे शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावरील दबाव वाढला होता. त्यामुळे त्यांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करून या वादातून स्वतःची सुटका करून घेतली, असा आरोप केला जात आहे.

    Shani Shingnapur Temple Removes Muslim Staff Hindutva Pressure

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    द फोकस एक्सप्लेनर : पाकिस्तानात राष्ट्रपती- लष्करप्रमुखांत संघर्ष शिगेला, असीम मुनीरकडून सत्तापालटाची तयारी?

    Trump Extends Tariff ट्रम्प यांनी टॅरिफची डेडलाइन 1 ऑगस्टपर्यंत वाढवली; जपान-दक्षिण कोरियावर प्रत्येकी 25% कर लादला

    Tejaswi Yadav : बिहारमधील जंगलराजची आठवण, तेजस्वी यादव यांच्याकडून मुस्लिम तृष्टीकरणासाठी गुंडांचे समर्थन