• Download App
    अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तींच्या शाळिग्राम शिळांचे पूजन आणि ठिकठिकाणी स्वागत!! Shaligram sheelas worshiped in gandaki river in Nepal for ram, sita idols in ayodhya

    अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तींच्या शाळिग्राम शिळांचे पूजन आणि ठिकठिकाणी स्वागत!!

    वृत्तसंस्था

    पोखरा (नेपाळ) : नेपाळमधून दोन विशाल शालिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. यापासून श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत. नेपाळमधून या शिळा निघाल्यानंतर ठिकठिकाणी हिंदू भाविक त्यांचे पुष्पवृटी करून जोरदार स्वागत करीत आहेत. जिथून शिळा जात आहेत, तिथे लोक श्रद्धेने नतमस्तक होत आहेत. Shaligram sheelas worshiped in gandaki river in Nepal for ram, sita idols in ayodhya

    या दोन्ही शाळिग्राम शिळा नेपाळमधील पोखरा येथील गंडकी नदीतून भूगर्भ आणि पुरातत्व तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काढण्यात आल्या आहेत. 26 जानेवारी रोजी त्या ट्रकमध्ये लोड केल्या. पूजनानंतर दोन्ही शिळा ट्रकने रस्त्याने अयोध्येला पाठवण्यात येत आहेत.

    एका शिळाचे वजन 26 टन आहे, तर दुसऱ्या शिळाचे वजन 14 टन आहे. दोन्ही शिळांचे वजन 40 टन आहे. गंडकी नदीच्या पात्रातून या शिळा काढण्यापूर्वी धार्मिक विधी करण्यात आले. नदीची क्षमापन याचिका करून विशेष पूजा करण्यात आली. आता शिळा अयोध्येला आणल्या जात आहेत.

    गाळेश्वर महादेव मंदिरात 26 जानेवारीला शिळांचा रुद्राभिषेकही करण्यात आला आहे. नेपाळमधील सीतामढीचे महंत दोन महिन्यांपूर्वी कारसेवक पुरम येथे रुद्राभिषेक करण्यासाठी आले होते. त्यांनीच ट्रस्टला शाळीग्राम शिळांची माहिती दिली. त्यानंतर या शिळा नदीतून बाहेर काढून अयोध्येत आणण्याचा कार्यक्रम ठरला. यामध्ये नेपाळ सरकारनेही सहभाग घेतला. शासनाच्या परवानगीनंतरच नदीतील शिळा काढण्यात आल्या आहेत. या शिळा शनिवारी जनकपूरला पोहोचल्या आहेत. तेथे दोन दिवसीय धार्मिक विधी केला आहे.

    त्यानंतर भारतात बिहारमधील दरभंगा, मुझफ्फरपूर मार्गे सहरघाट, मधुबनी, बिहारमधील बेनीपट्टी येथे शिळा पोहोचतील. त्यानंतर 31 जानेवारीला गोपालगंज मार्गे उत्तर प्रदेशात प्रवेश करतील. या वेळी देखील हिंदू भाविक त्यांचे जोरदार स्वागत करणार आहेत.

    Shaligram sheelas worshiped in gandaki river in Nepal for ram, sita idols in ayodhya

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली