विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम केलेले माजी प्रशासकीय अधिकारी शक्ती सिन्हा (वय ६४) यांचे निधन झाले. होते.
सिन्हा यांच्या मागे पत्नी सुरभी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांची पत्नी सुरभी याही निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.Shaki sinha no more
शक्ती सिन्हा यांचा जन्म १९५७ मध्ये बिहारमध्ये झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या आयपीएस तुकडीतील पोलिस अधिकारी होते. सिन्हा हे १९७९च्या तुकडीतील प्रशासकीय अधिकारी होते.
नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररीचे ते माजी संचालक होते. त्यांनी १९९६ ते १९९९ या कालावधीमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत काम केले होते. ‘वाजपेयी ः द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते.
Shaki sinha no more
महत्त्वाच्या बातम्या
- क्रुज रेव्ह पार्टीतून पुणे अत्यंत बड्या महाविकास आघाडीच्या नेत्याचा मुलगा पळाला!!
- महाराष्ट्र सरकारचा जमीनाचा रेट १६ कोटीरुपये, ऐवढा रेट असेल तर मी कुठून रस्ते बांधणार, नितीन गडकरी यांचा सवाल
- ओमर अब्दुल्ला यांनी उत्तर प्रदेशची तुलना केली जम्मू-काश्मीरशी, संतप्त नेटकरी म्हणाले येथे इथे धर्मांतर न केल्यास कोणालाही बळजबरीने राज्य सोडण्याची वेळ येत नाही