वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई विमानतळावरील कस्टम ड्युटी अधिकाऱ्यांनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला देखील सोडले नाही. त्याची विमानतळावर तासभर चौकशी आणि तपास करून त्याच्या बॅगेत आढळलेल्या महागड्या घड्याळांवरची सुमारे 6.87 लाख रुपयांची कस्टम्स ड्युटी वसूल केली आणि त्यानंतरच त्याच्या टीमला सोडून दिले. शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुरू झालेली ही कायदेशीर कारवाई शनिवारी 12 नोव्हेंबर 2022 रोजी पहाटे संपली. सुमारे 18 लाख रुपयांच्या घडाळ्यांवर 6.87 लाख रुपयांची कस्टम ड्युटी अधिकाऱ्यांनी वसूल केली. Shahrukh Khan interrogation and investigation at Mumbai airport
शारजामध्ये इंटरनॅशनल बुक फेरला बुक फेअर मध्ये सामील होण्यासाठी शाहरुख खान तिथे गेला होता तिथून चार्टर्ड प्लेन ने परतल्यानंतर मुंबई विमानतळावरील एअर इंटेलिजन्स युनिटने शाहरुखला आणि त्याच्या टीमला रोखले त्या सर्वांची चौकशी आणि तपासणी केली. या तपासणीत त्यांना शाहरुख खानच्या बॅगेत काही महागडी घड्याळे आढळली. त्याची कस्टम्स ड्युटी भरली नसल्याचेही आढळून आले. या घड्याळांची किंमत 18 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शाहरुखला त्यावरची 6.83 लाख रूपये कस्टम ड्यूटी भरावी लागली.
हिंदू मुलीला जाळणाऱ्या शाहरुखचे नाव दाखवले अभिषेक!!; लिबरल मीडियाचा हिंदू द्वेष उघड!!
शाहरुख खान कडे Babun & Zurbk, Rolex घड्याळाचे 6 डबे आणि Spirit ब्रांडचे घड्याळ, ऐपल सीरीजची घड्याळे आढळली त्याचबरोबर घड्याळांचे काही रिकामे बॉक्स आढळले. यावरून शाहरुख खान आणि त्याच्या टीमची एअर इंटेलिजन्स युनिटने चौकशी आणि तपास केला. त्यानंतर शाहरुख खान शनिवारी पहाटे 5.00 वाजता मुंबई विमानतळातून बाहेर पडताना दिसला. त्याच्याबरोबर त्याची मॅनेजर पूजा ददलानी ही देखील होती.
असेही सांगितले जाते, की एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खान आणि पूजा ददलानी याची चौकशी आणि तपास केल्यानंतर त्यांना सोडून दिले. मात्र शाहरुखच्या बॉडीगार्डना मागे ठेवले. शाहरुखचा बॉडीगार्ड रवी याने शाहरुखच्या क्रेडिट कार्ड मधून 6 लाख 87 हजार रुपयांची कस्टम ड्युटी भरली. त्यानंतर त्याला एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावरून जाऊ दिले.
Shahrukh Khan interrogation and investigation at Mumbai airport
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंना जाहीर इशारा देणारे खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात दाखल
- सर्व काही सरकारनेच करावे हा विचार अभारतीय; दत्तात्रय होसबाळे यांचे प्रतिपादन
- इतिहासाची पुनरावृत्ती, दोन नातू एकत्र; माध्यमे मात्र रंगवताहेत आभासी चित्र!!
- हर हर महादेव सिनेमाच्या प्रेक्षकाला मारहाण केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना अटक