• Download App
    Shahi Imam shabbir ahamad Siddiqui apeal to muslims to Unitedly vote for Congress against BJP in gujrat polls

    गुजरात मध्ये मुसलमानांनी एकजूट होऊन काँग्रेसला मतदान करावे; इमाम शब्बीर सिद्दिकींचे आवाहन

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : गुजरात मध्ये भाजपला हरवण्यासाठी सर्व मुस्लिमांनी एकजूट करून भाजप विरोधात काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन अहमदाबादच्या जामा मशिदीचे शाही इमान शब्बीर अहमद सिद्दिकी यांनी केले आहे. हेच ते शब्बीर अहमद सिद्दिकी आहेत, ज्यांनी महिलांनी निवडणूक लढविणे ही इस्लामशी बंडखोरी असल्याचे मत व्यक्त केले आहे. Muslims should unite and vote for Congress in Gujarat

    गुजरात विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचे आज सोमवारी 5 डिसेंबर 2022 रोजी मतदान होत असताना शब्बीर अहमद सिद्दिकी यांनी मुसलमानांना एक गठ्ठा मतदानाचे आवाहन करून राज्याच्या राजकारणात वेगळा पेच तयार केला आहे. भाजप विरोधात आम आदमी पार्टी आणि असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम पक्ष यांनीही उमेदवार उभे केले असताना सिद्दिकी यांनी मात्र मुस्लिमांनी एक गठ्ठा मतदान करून भाजपचा पराभव करावा, असे वक्तव्य केल्याने त्यांचा झुकाव काँग्रेसकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    या साठी त्यांनी 2012 चे उदाहरण देखील दिले आहे. 2012 मध्ये जमालपूर विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांचे बहुमत असून देखील तिथे मतांमध्ये फूट पडल्याने भाजपचा उमेदवार जिंकला होता. असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे मुस्लिम बहुसंख्य आहे पण मुस्लिम मतदारांमध्ये फूट पडल्याने भाजप विजयी होतो. त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत मुस्लिमांनी एकजूट करून भाजप विरोधात मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

    Shahi Imam shabbir ahamad Siddiqui apeal to muslims to Unitedly vote for Congress against BJP in gujrat polls

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!