वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शाहीन बागेत काल रात्री सापडलेल्या ड्रग्सच्या तारा मोठ्या रॅकेट आणि सिंडिकेटशी जोडल्या असून दुबई, अफगाणिस्तान, पाकिस्तान तसेच भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून ते संपूर्ण उत्तर भारतात पसरल्या आहेत. “नार्को टेरर”मधून आलेले यामागे फार मोठे कट कारस्थान आहे. देशभरात यासाठी विविध शहरांमध्ये छापे घालण्यात येत आहेत. लवकरच या रॅकेट आणि सिंडिकेटचा खुलासा होईल, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख आर. एन. प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.Shaheen Bagh Drugs: Drugs in Shaheen Bagh linked to “Narco Terror”; Syndicate stars in Dubai, Afghanistan, Pakistan
शाहीन बागेत काल तब्बल 50 किलो हेरॉईन आणि अन्य ड्रग्स पकडण्यात आली होती. तेथेच 30 लाख रुपयांची कॅश सापडली.
2 अफगाणींना अटक
त्यानंतर आज दिवसभरात 4 लोकांना अटक करण्यात आली असून भोपाळमध्ये दोघांना तसेच दिल्लीत दोन अफगाण नागरिकांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहीन बागेत आलेली हेरोईनची खेप अफगाणिस्तानातून आली होती. त्यांच्या तारा अफगाणिस्थान पाकिस्तान दुबई पर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. दुबईतून मोठे सिंडिकेट ऑपरेट होत आहे आणि संपूर्ण भारतभर ड्रग्स सप्लाय करत आहे. यामागचा मास्टर माईंड लवकरच पकडण्यात येईल असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला आहे.
किनारपट्टी ते राजधानी
गेल्या वर्षभरामध्ये भारताच्या किनारपट्टीवर विशेषत: गुजरातमधल्या कांडला बंदर, महाराष्ट्रातले जेएनपीटी आदी बंदरांवर मोठ्या प्रमाणावर ड्रग्स पकडण्यात आले होते. त्याची किंमत हजारो कोटी रुपयांमध्ये होती. परंतु, आता देशाच्या राजधानी 50 किलो हेरॉइन पकडले जाणे ही बाब सर्वाधिक गंभीर आहे
आणि याच्या तारा “नार्को टेररशी” संबंधित आहेत. त्यामुळे अधिक गांभीर्याने आणि सखोल तपास सुरू आहे. विविध ठिकाणी छापे घातल्यानंतर यासंदर्भात अधिक खुलासा होणार आहे. छाप्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार असून याचा मास्टरमाईंड लवकरच पकडण्यात येईल, असे प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.
Shaheen Bagh Drugs: Drugs in Shaheen Bagh linked to “Narco Terror”; Syndicate stars in Dubai, Afghanistan, Pakistan
महत्त्वाच्या बातम्या
- कॅप्टन अमरिंदरसिंगांच्या पटियालात खलिस्तानी समर्थकांना शिवसैनिक भिडले!!; दगडफेक, तलवारी नाचवल्या, पोलिसांचा गोळीबार
- Raj Thackeray : संभाजीनगर सभेच्या “यशस्वीतेसाठी” सर्व विरोधकांचा केवढा तो “आटापिटा”…!!
- AC local : ऐन उन्हाळ्यात केंद्राचा दिलासा; मुंबईत एसी लोकलच्या तिकीट दरांत 50 % कपात!!
- रुपाली पाटील यांची फेसबुकवर बदनामी प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल