विशेष प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी बऱ्याच मोठ्या लोकांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट्ट, मेधा पाटकर, तुषार गांधी असे दिग्गज कलाकार उपस्थित होते. ममता बॅनर्जी यांनी या कलाकारांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आर्यन खानची अटक या प्रकरणावरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
Shah Rukh Khan is political victim and Mahesh Bhatt were deliberately targeted; West Bengal Chief Minister Mamata Banerjee
शाहरुख खानचा विनाकारण राजकीय बळी देण्यात आला, असे मत त्यांनी आर्यन खानच्या प्रकरणात दिले आहे. भाजपाला क्रूर आणि अलोकतांत्रिक पक्ष देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांनादेखील जाणूनबुजून टार्गेट करण्यात आले होते, शाहरुख खानलाही त्रास देण्यात आला होता. जर आपल्याला जिंकायचे असेल तर आपल्याला लढलं पाहिजे. आणि बोललं पाहिजे. म्हणून आम्हाला राजकीय पक्ष म्हणून मार्गदर्शन करा आणि सल्ला द्या असे त्यांनी उपस्थित कलाकारांसोबत बोलताना म्हटले आहे.
पुढे त्या हे देखील म्हणाल्या की, सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणं सहज शक्य होणार आहे. आपल्या भाषणात त्यांनी या वेळी रवींद्रनाथ टागोर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील आवर्जून उल्लेख केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई हे एक सांस्कृतिक केंद्रही आहे. पश्चिम बंगाल आणि मुंबई हे यांचे नाते खूप जुने आहे, असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून अभिवादन केले आणि शुभेच्छाही दिल्या.
Shah Rukh Khan is political victim and Mahesh Bhatt were deliberately targeted; West Bengal Chief Minister Mamata Banerjee
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच ; अनिल परब यांनी दिली महत्वाची माहिती
- गोरगरीबांसाठीच्या उज्वला योजनेतही माध्यमाकडून राजकारण, मोदी सरकारने २०१९ पूर्वीच बहुतांश गरजुंपर्यंत पोहोचण्याचा केला प्रयत्न
- पोलीसच बनले वऱ्हाडी, पळून गेलेल्या युवक-युवतीचा पोलीस ठाण्यातच लावला विवाह
- मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना संपत चालली, चंद्रकांत पाटील यांचा आरोप