विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगाल मधल्या संदेशखालीतल्या महिला अत्याचाराचा मास्टरमाईंड शहाजान शेख याची संदेशखाली मध्ये कित्येक वर्षे दादागिरी सुरू होती, पण ती दादागिरी अवघ्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पूर्ण उतरली. अधिकाऱ्यांचा हात धरून त्याला कोर्टात दुसऱ्यांदा जामीनासाठी आज हजर राहावे लागले.Shah Jahan Sheikh’s years of fun ended up in 10 days of police custody, he had to hold the hands of the officers and be present in the court!!
शेख शहाजहान याला अटक करून पहिल्यांदा कोर्टात हजर केले, तेव्हा एखाद्या महानेत्याच्या थाटात पांढरा शर्ट, पांढरे जॅकेट, पांढरी पॅन्ट घालून तो आला होता. आपल्या समर्थकांपुढे हात उंचावत तो कोर्ट रूम मध्ये गेला होता. त्याची त्यावेळची सगळी बॉडी लँग्वेज मस्तीखोरीची होती, पण आज जेव्हा पोलिसांनी त्याच शहाजहान शेखला कोर्टात हजर केले, त्यावेळी त्याला पोलीस अधिकाऱ्यांचे हात धरून कोर्टासमोर हजर राहावे लागले. त्याच्या पांढऱ्या शुभ्र जॅकेट, शर्ट आणि पॅंटीचा रुबाब पूर्ण उतरला होता. अत्यंत साध्या पोशाखात तो खांदे पाडून कोर्टात हजर झाला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यातूनच त्याची वर्षानुवर्षांची दादागिरी फक्त 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत उतरून गेली हे दिसून आले.
शेख शहाजहान सहानुभूती दाखवायच्या लायकीचा आरोपी नाही; त्याच्यावर 42 केसेस, 10 वर्षे कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील!!
शेख शहाजहान हा सहानुभूती दाखवायच्या लायकीचा आरोपी नाही. त्याच्यावर तब्बल 42 केसेस आहेत. त्याला पुढची 10 वर्षे कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील, अशा कठोर शब्दांमध्ये कोलकत्ता हायकोर्टाने संदेशखालीतल्या महिला अत्याचाराचा मास्टरमाईंड शेख शहाजहान याच्यावर ताशेरे ओढले होते. त्याला कोर्टाने 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवून दिले होते. त्यानंतर आजच त्याला बशीरहाट कोर्टात हजर केले, तेव्हा त्याची मस्ती साफ उतरलेली दिसली.
पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारच्या पोलिसांनी शेख शहाजहान याला 55 दिवसानंतर अटक करून बशीरहाट मधल्या कोर्टात कोर्टासमोर हजर केले होते. त्याला कोर्टाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, पण शेख शहाजहान याच्या वकिलांनी कोलकत्ता हायकोर्टात धाव घेत त्याला जामीन मागितला होता. त्यावर कोलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवगणम यांनी कठोर शब्दांमध्ये शेख शहाजहान आणि त्याच्या वकिलांना फटकारले होते.
आम्ही तुमची कोर्टासमोर येण्याची वाटच पाहत होतो. शेख शहाजहान याच्याविरुद्ध 42 केसेस पेंडिंग आहेत. काही केसेस 20 वर्षे जुन्या आहेत. शेख शहाजहान हा आरोपी सहानुभूती दाखवायच्या लायकीचा नाही. त्याला आणि वकिलांना पुढची 10 वर्षे कोर्टाच्या चकरा माराव्या लागणार आहेत, अशा कठोर शब्दांमध्ये मुख्य न्यायाधीशांनी शेख शहाजहान याच्या कारनाम्यांवर कठोर ताशेरे ओढले होते.
पश्चिम बंगाल मधल्या रेशन घोटाळ्यातला शेख शहाजहान हा एक आरोपी आहे. याच घोटाळ्यात ईडीने त्याच्या ठिकाणांवर छापे मारण्याचा प्रयत्न केला असताना त्याच्या गुंडांनी ईडीच्या पथकावर हल्ला केला होता. त्यानंतर शेख शहाजहान हा देशभर कुप्रसिद्ध झाला.
पण शेख शहाजहान याच्यावर फक्त रेशन घोटाळ्याचा आरोप नाही तर त्यापलीकडे जाऊन त्याने गेल्या 20 वर्षांमध्ये खूप गंभीर गुन्हे केले आहेत. तोच संदेशखालीतल्या महिला अत्याचाराचा मास्टमाईंड आहे. आपल्याला आवडेल ती हिंदू महिला आणून तिच्यावर अत्याचार करणे, आपल्या गुंडांना महिला पुरवणे असले उद्योग त्याने वर्षानुवर्षे केले होते. पण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा तो पदाधिकारी असल्याने त्याच्या सगळ्या कारनाम्यानवर ममता बॅनर्जी आणि तिथल्या पोलिसांनी पांघरून घातले होते. संदेशखाली मध्ये काही दिवसांपूर्वी संतप्त महिलांनी एकत्र येऊन मोठा मोर्चा काढला होता. त्यामुळे शेख शहाजहानने केलेले अत्याचार सगळ्या देशात समजले होते. त्याच्या विरुद्ध वातावरण तयार झाले. खुद्द ममता बॅनर्जींना त्याची राजकीय डोकेदुखी झाल्याने खुलासे करावे लागले.
संदेशखालीतील महिलांनी एकत्र येऊन शेख शहाजहान याचा भावाचे फार्म हाऊस जाळून टाकले होते. त्याच्या विरोधात प्रचंड संताप उसळल्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांना त्याच्या विरोधात कारवाई करावी लागली. पण त्याला अटक करताना देखील पश्चिम बंगाल पोलिसांनी चलाखी करत त्याच्याविरुद्ध महिला अत्याचार प्रतिबंधक 354 कलम लावले नाही. त्याला बाकीच्या कलमानखाली अटक केली आहे.
पण तरी देखील कोलकत्ता हायकोर्टाने शेख शहाजहान याच्या विरोधातल्या सर्व केसेसचा बारकाईने विचार करून पहिल्याच सुनावणीत त्याच्यावर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले. इतकेच नाहीतर पुढची 10 वर्षे त्याला कोर्टाच्या चक्रात माराव्या लागतील, असा स्पष्ट शब्दात इशारा देऊन त्याचे राजकीय करिअर पूर्ण संपुष्टात आणण्याचेच सूचित केले. तृणमूळ काँग्रेसने देखील आता उशिराने जाग येत त्याला पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे.