कोलकाता येथील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी, निलंबित टीएमसी नेता शाहजहान शेख याच्या नऊ निकटवर्तीयांना आणि ओळखीच्या व्यक्तींना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीसाठी बोलावले आहे.Shah Jahan Shaikhs troubles increase CBI sends summons to 9 close associates
CBIने त्याला सोमवारी कोलकाता येथील निजाम पॅलेस येथील सीबीआय कार्यालयात एजन्सीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 5 जानेवारी रोजी ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात या नऊ जणांचा कथित सहभाग असल्याचा संशय एजन्सीला आहे.
पश्चिम बंगाल मधल्या संदेशखालीतल्या महिला अत्याचाराचा मास्टरमाईंड शहाजान शेख याची संदेशखाली मध्ये कित्येक वर्षे दादागिरी सुरू होती, पण ती दादागिरी अवघ्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पूर्ण उतरली. अधिकाऱ्यांचा हात धरून त्याला कोर्टात दुसऱ्यांदा जामीनासाठी हजर राहावे लागले.
Shah Jahan Shaikhs troubles increase CBI sends summons to 9 close associates
महत्वाच्या बातम्या
- बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक संघात पवारांनी दिली वय वाढल्याची कबुली, पण…!!
- जरांगेंच्या आंदोलनामुळे जेवढी मराठा मतांमध्ये एकजूट, तेवढीच मराठा + इतरांच्या मतांमध्ये फाटाफूट; वाचा आकडेवारी!!
- जम्मू काश्मीर : पुंछमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट फसला, 7 आयईडी आणि वायरलेस सेट जप्त
- सावरकरांच्या नाशिक जिल्ह्यात यायला राहुल गांधींना “वायनाड” सापडला; आदित्य आणि पवार येणार साथीला!!