• Download App
      Sexual abuse पाेर्न व्हिडीओ दाखवित अकाेल्यात शिक्षकाकडून सहा मुलींचे लैंगिक शाेषण

      Sexual abuse : पाेर्न व्हिडीओ दाखवित अकाेल्यात शिक्षकाकडून सहा मुलींचे लैंगिक शाेषण

    विशेष प्रतिनिधी

    अकाेला : बदलापूर येथील  अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शाेषणाची घटना ताजी असतानाच अकाेला जिल्ह्यात एका शिक्षकाने पाेर्न व्हिडीओ दाखवित सहा मुलींचे लैंगिक शाेषण केल्याचा किळसवांणा प्रकार उघडकीस  आले आहे. संबंधित शिक्षकाला पाेलीसांनी अटक केली  आहे.  Sexual abuse of six girls by a teacher in Akola showing porn videos

    प्रमोद सरदार असे या 47 वर्षीय आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असून मंगळवारी त्याला ताब्यात घेण्यात आले.या शिक्षकाची  अल्पवयीन विद्यार्थीनींनी तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस  आला.  आठवीत शिकणाऱ्या  एका विद्यार्थ्याने बाल कल्याण केंद्राच्या टोल-फ्री हेल्पलाइनवर कॉल केला आणि अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली.

    या भेटीचे कारण त्यांनी गुप्त ठेवले हाेते. समितीच्या सदस्यांनी  आठवीतील मुलींशी वैयक्तिक संवाद साधला.  या संवादादरम्यान मुलींनी गेल्या चार महिन्यांपासून सहन करावा लागत असलेला प्रकार सांगितला. त्यानंतर बालकल्याण समितीच्या सदस्यांनी  पोलिसांना बोलावून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आणि आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला. राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी या शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक प्रमोद सरदार यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र समदूर म्हणाले, “काल शाळेत एक कार्यक्रम होता कार्यक्रम संपल्यानंतर शिक्षक सातवी-  आठवीच्या विद्यार्थ्यांना भेटायला गेले.  4-5 मुलींनी सांगितले की त्यांचा छळ होत आहे, त्यानंतर आम्हाला हे कळले, तोपर्यंत आम्हाला अशी कोणतीही माहिती नव्हती. आरोपी शिक्षक गेल्या चार महिन्यांपासून विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता.  त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करत होता. उरल पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये नमूद केलेल्या तपशिलानुसार, सहा अल्पवयीन विद्यार्थिनींनी तक्रार केली आहे की शिक्षक त्यांना गेल्या चार महिन्यांपासून अश्लील व्हिडिओ दाखवत आहेत.

    उरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल ढोले म्हणाले, “आम्हाला बालकल्याण समितीच्या सदस्याचा फोन आला. त्यानंतर  आम्ही पथक शाळेत पाठवले. अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवले. शिक्षक प्रमोद सरदार त्यांना अश्लिल फोटो दाखवून अयोग्यरित्या स्पर्श करायचा. आम्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्यावर पाॅस्काे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    Sexual abuse of six girls by a teacher in Akola showing porn videos

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट

    Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच