कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली. मानवतेला काळीमा फासणारा प्रकार सोशल मीडियातून उजेडात आला आहे. या अत्याचाराच्या विरोधात ऑनलाईन चळवळही सुरू झाली आहे.Sex demand from girl seeking oxygen for corona-stricken father
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली. मानवतेला काळीमा फासणारा प्रकार सोशल मीडियातून उजेडात आला आहे. या अत्याचाराच्या विरोधात ऑनलाईन चळवळही सुरू झाली आहे.
दिल्लीतील एका गरीब मुलीच्या अत्याचाराची ही कहाणी एका तरुणीने सोशल मीडियातून सांगितली आहे. पीडित मुलगी आपल्या कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजनचा शोध घेत होती. त्याचवेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने मुलीकडे ऑक्सिजन सिलिंडर्सच्या बदल्यात सेक्सची मागणी केली.
अत्यंत घाणेरड्या भाषेत त्या व्यक्तीने पीडित मुलीकडे सेक्सची मागणी केली. अशा प्रसंगी काय करायचे, असा सवाल हा प्रकार उजेडात आणणाºया भावरीन कंधारी या तरुणीने सोशल मीडियातून उपस्थित केला आहे.
माझ्या मित्राच्या बहिणीच्या बाबतीत हा कटु अनुभव घडल्याचे भावरीनने निदर्शनास आणून दिले आहे. तिने यासंदर्भात ट्विट करताच सोशल मीडियातील हजारो तरुण-तरुणींनी या प्रकारावर चीड व्यक्त केली.
भावरीन कंधारी या तरुणीच्या ट्विटनंतर सोशल मीडियात कोरोना महामारीतील अत्याचाराविरोधात ऑनलाईन चळवळच उभी राहिली आहे. संपूर्ण देशभरातील हजारो तरुण-तरुणींनी या गंभीर प्रकारावर चर्चा करून सरकारला कारवाईसाठी भाग पाडण्याचा निर्धार केला आहे.
नराधमाचे नाव जाहीर करून त्याची समाजात इज्जत काढण्याची मागणी केली आहे, तर अनेकजण याबाबत पोलिसांकडेच रितसर करण्याचा पर्याय योग्य असल्याचे मत व्यक्त करीत आहेत. याचवेळी अनेकांनी पीडित मुलीला न्याय मिळेल की नाही, याबाबतही शंका उपस्थित केली आहे.
त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त केला आहे. पोलिस वेळकाढू धोरण अवलंबतील. त्यामुळे गुन्हा सिद्ध होईल की नाही, तसेच पीडितेला न्याय मिळेल की नाही, याबाबत शाश्वती देता येणार नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.